पुणे : कासारसाई येथील बिबट्या कॅमेऱ्यात कैद ; वनविभाग आता तरी जागा होणार का?, ग्रामस्‍थांचा सवाल

पुणे : कासारसाई येथील बिबट्या कॅमेऱ्यात कैद ; वनविभाग आता तरी  जागा होणार का?, ग्रामस्‍थांचा सवाल
Published on
Updated on

हिंजवडी (पुणे) : कासारसाई येथील बिबट्याचे बछडे पुढरीच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. आता तरी वनविभाग जागा होणार का ? असा प्रश्न येथील नागरिक आणि ग्रामस्थांनी उपस्थित करत बिबट्याला पकडण्याची मागणी केली आहे.

मागील काही दिवसांपासून पुणे परिसरात बिबट्या दिसल्याचे आणि बिबट्याने जनावरांवर हल्ले केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तरी देखील वनविभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही.  यापूर्वी देखील कासारसाई येथील बिबट्याचा वावर असल्याचे स्‍पष्‍ट झाले हाेते. मात्र अद्यापही वनविभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही.

येथील परिसरात त्वरित पिंजरा लावून या बिबट्याना ताब्यात घेऊन सुरक्षितस्थळी हलवण्यात यावे यासंबंधी ग्रामस्थ मागणी करत आहेत. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांची ही मागणी मान्य होते, की यास केराची टोपली दाखवण्यात येणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे.

हेही वाचलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news