Pune Leopard Capture Operation: जुन्नर वन विभागाची ऐतिहासिक मोहीम; चार महिन्यांत 100 बिबट्यांना जेरबंद

पुणे जिल्ह्यातील बिबट-मानव संघर्षावर नियंत्रणासाठी मोठी कारवाई; 20 बिबट्यांचे ‘वनतारा’ प्रकल्पात स्थलांतर
Leopard Captured
Leopard CapturedPudhari
Published on
Updated on

सुनील जगताप

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्‌‍ट्यात विशेषतः जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यांत बिबट्या आणि मानव यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला असतानाच वन विभागाने ऐतिहासिक मोहीम हाती घेतली आहे. गेल्या चार महिन्यांत जुन्नर वन विभागाच्या विविध क्षेत्रांतून तब्बल 100 बिबट्यांना यशस्वीरीत्या जेरबंद केले आहे.

Leopard Captured
Maharashtra CET Exam Rules 2026: सीईटी 2026 साठी कडक नियमावली; एआय व डिजिटल कॉपीवरही कारवाई

वाढत्या दहशतीला लगाम घालण्यासाठी राबविण्यात आलेल्या या ‌‘मेगा ऑपरेशन‌’मुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पुणे विभागात आता एकूण 150 बिबट्यांच्या व्यवस्थापनाचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. बिबट्यांचा उपद्रव रोखण्यासाठी वन विभागाने संपूर्ण जुन्नर विभागासह ओतूर, शिरूर, मंचर, घोडेगाव, खेड, चाकण विभागीय क्षेत्रामध्ये पिंजऱ्यांचे जाळे पसरले आहे. सध्या या सर्व विभागांत साधारण 250 हून अधिक पिंजरे उपलब्ध आहेत. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जुन्नर आणि पुणे परिसरात सध्या बिबट्यांच्या दहशतीने नागरिक भयभीत असताना वन विभागाच्या वतीने ही मोहीम राबविल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या पुणे विभागात एकूण 150 बिबट्यांचा वावर असून, त्यांपैकी 10 टक्क्यांहून अधिक बिबट्यांचे गुजरातच्या ‌‘वनतारा‌’ प्रकल्पात स्थलांतर केले आहे.

Leopard Captured
Pune Gas Cylinder Black Marketing: गॅस सिलिंडर काळाबाजार रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन अलर्ट

बिबट्यांना मिळतोय माणिकडोहचा ‌‘निवारा‌

जुन्नर आणि परिसरात पकडलेल्या बिबट्यांची रवानगी जुन्नरच्या माणिकडोह बिबट बचाव केंद्रात केली जात आहे. या ठिकाणी 50 बिबट आधीपासूनच होते. नव्याने 100 बिबट्यांपैकी 20 बिबट्यांची रवानगी ‌‘वनतारा‌’मध्ये केल्याने आता या निवारा केंद्रात 130 बिबटे आहेत.

Leopard Captured
Pune Municipal Corporation Hall Renovation: पुणे महापालिकेच्या जुन्या सभागृहाचे 2.22 कोटींत नूतनीकरण

‌‘वनतारा‌’ ठरले आधारवड

पुणे विभागातील वाढती संख्या पाहता 20 बिबट्यांना यशस्वीरीत्या गुजरात येथील ‌‘वनतारा‌’ प्रकल्पात हलविण्यात आले आहे. यामुळे स्थानिक केंद्रांवरील ताण कमी होण्यास मदत झाली आहे. प्रशासनाचे हे चोख नियोजन केवळ बिबट्यांच्या संवर्धनासाठीच नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ‌‘सुरक्षा कवच‌’ ठरत आहे.

Leopard Captured
Pune Municipal Budget 2026: पुणे महापालिकेचा 13,995 कोटींचा अर्थसंकल्प सादर; स्थायी समितीकडून बदलांची शक्यता

जुन्नर आणि परिसरात वाढलेल्या बिबट्यांच्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू आहे. या मोहिमेमधून 100 बिबट्यांना जेरबंद करण्यात यश आले असून, त्यातील 20 बिबट्या वनताराकडे स्थलांतरित केले आहे. या मोहिमेसाठी जवळपासून 250हून अधिक पिंजरे लावले आहेत. प्रत्येक वनपरिक्षेत्रातील बेस कॅम्पमध्ये प्रत्येकी 10 सदस्यांचे पथक तैनात असून, एकूण 70 प्रशिक्षित कर्मचारी या रेस्क्यू मोहिमेत जिवाची बाजी लावून काम करीत आहेत.

स्मिता शिरीष राजहंस, सहायक वनसंरक्षक, जुन्नर वन विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news