Leopard Attack Pune: शेवटी नरभक्षक बिबट्याचा अंत; शार्प शूटर पथकाची अचूक कारवाई

पिंपरखेड परिसरात दहशत माजवणाऱ्या बिबट्याला ठार; वन विभागाचे धाडसपूर्ण अभियान यशस्वी
शेवटी नरभक्षक बिबट्याचा अंत; शार्प शूटर पथकाची अचूक कारवाई
शेवटी नरभक्षक बिबट्याचा अंत; शार्प शूटर पथकाची अचूक कारवाईPudhari
Published on
Updated on

पिंपरखेड : जिल्ह्यातील पिंपरखेड आणि परिसरात गेल्या २० दिवसांत धुमाकूळ घालत दोन चिमुकले आणि एका वृद्ध महिलेचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला वन विभागाकडून तैनात करण्यात आलेल्या शार्प शुटर पथकाकडून ठार मारण्यात अखेर यश आले आहे.(Latest Pune News)

शेवटी नरभक्षक बिबट्याचा अंत; शार्प शूटर पथकाची अचूक कारवाई
Land Regularization Maharashtra: राज्यातील दोन कोटी कुटुंबांच्या जमिनी होणार अधिकृत

पिंपरखेड व परिसरामध्ये मागील वीस दिवसांमध्ये दिनांक १२ ऑक्टोबर रोजी शिवन्या शैलेश बोंबे (वय ५ वर्ष ६ महिने), दिनांक २२ ऑक्टोबर रोजी भागुबाई रंगनाथ जाधव (वय ८२) आणि रोहन विलास बोंबे (वय १३) यांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याने मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळला होता. परिणामी जुन्नर, शिरूर, आंबेगाव व खेड तालुक्यामधील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ दिनांक १२ आणि २२ ऑक्टोबर रोजी पंचतळे येथे बेल्हे-जेजुरी राज्यमार्ग रोखून तसेच दिनांक ३ नोव्हेंबर रोजी मंचर येथे पुणे-नाशिक महामार्ग रोखून वरील चारही तालुक्यातील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केले होते.

शेवटी नरभक्षक बिबट्याचा अंत; शार्प शूटर पथकाची अचूक कारवाई
Pune Municipal Elections: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची आचारसंहिता लागू

यासह दिनांक २ नोव्हेंबर रोजी बिबट हल्ल्यात रोहन विलास बोंबे या १३ वर्षाच्या लहान मुलाचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने वनविभागाच्या गस्ती वाहन तसेच येथील स्थानिक बेस कॅम्प इमारत पेटवून देऊन मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली होती. तसेच दिनांक ३ नोव्हेंबर रोजी संतप्त नागरिकांनी पुणे-नाशिक महामार्ग सुमारे १८ तास रोखून धरला होता. नरभक्षक झालेल्या पिंपरखेड परिसरातील बिबट्यास जेरबंद किंवा ठार करण्यासाठी वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी तातडीने प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव तथा मुख्य वन्यजीव रक्षक महाराष्ट्र राज्य यांची परवानगी घेतली होती. हा नरभक्षक बिबट्या जेरबंद किंवा ठार करण्यासाठी वन विभागाने रेस्क्यू संस्था पुणेचे पशु चिकीत्सक डॉ. सात्विक पाठक, जुबिन पोस्टवाला व डॉ. प्रसाद दाभोळकर या दोन शार्प शूटरसह वनविभागाची टीम घटनास्थळ परिसरात तैनात करून या नरभक्षक बिबट्यास जेरबंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली.

शेवटी नरभक्षक बिबट्याचा अंत; शार्प शूटर पथकाची अचूक कारवाई
Leopard Safari Pune: शक्य त्या वनक्षेत्रात बिबट सफारीचे प्रस्ताव पाठवा; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे वन विभागाला आदेश

दिवसभरात परिसरात ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून बिबट्याचे भ्रमण मार्गावरील ठशांचे निरीक्षण करण्यात आले. त्यानंतर रात्री तीन थर्मल ड्रोनच्या माध्यमातून घटनास्थळाच्या परिसरामध्ये त्या नरभक्षक बिबट्याचा शोध घेतला असता घटनास्थळापासून सुमारे ४०० ते ५०० मीटर अंतरावर हा बिबट दिसून आला असता त्यास टीमने त्यास बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला, परंतु तो अपयशी ठरल्याने बिबट चवताळून प्रति हल्ला करत असताना बंदूकधारी शार्प शूटर यांनी त्यावर रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास गोळी झाडल्याने हा नर बिबट मृत झाला. त्याचे वय अंदाजे पाच ते सहा वर्ष असल्याचे दिसून आले. त्यानंतर या नरभक्षक बिबट्याचे शव पिंपरखेड येथील ग्रामस्थांना दाखविण्यात येऊन ते शवविच्छेदनाकरिता माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे हलविण्यात आले.

ही कार्यवाही वनसंरक्षक आशिष ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली जुन्नरचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस व अमृत शिंदे, शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे व रेस्क्यू संस्थेचे सदस्य यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी केले.

शेवटी नरभक्षक बिबट्याचा अंत; शार्प शूटर पथकाची अचूक कारवाई
Pimparkhed Leopard Attack: रोहन बोंबेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार बिबट्याच्या हल्ल्यानंतर पिंपरखेड गावात जनभावनांचा उद्रेक

रोहन बोंबेवर हल्ला झालेले घटनास्थळ परिसरातील ड्रोनने टिपलेल्या बिबट्याची हालचाल, त्याचे पगमार्क (पायाचे ठसे), हल्ला झालेल्या घटनास्थळी घेतलेले पगमार्क याचे तज्ञ टीम कडून निरिक्षण करण्यात आले आहे. पगमार्क जुळल्याने त्याला ठार करण्यात आले असून हा तोच नरभक्षक बिबट्या आहे.

स्मिता राजहंस, सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news