Leopard Attack Farmer: शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला; भरदिवसा थरार

ओतूरच्या रहाटीमळा परिसरात घटना; आरडाओरडमुळे शेतकरी बचावला, पायाला जखम
Leopard Pune Otur
Leopard Pune OturPudhari
Published on
Updated on

ओतूर: आज मंगळवारी दुपारी चार वाजण्याचा सुमारास शेतकरी आपल्या शेतात काम करण्यात मग्न असताना बाजूच्याच शेतात अगोदरच दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेतकऱ्यावर वेगात झेप घेऊन जबर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याने वेळीच सावध पवित्रा घेत मोठमोठ्याने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे शेतकरी तात्काळ घटनास्थळी हजर होत गलका केल्यामुळे शेतात थांबून राहिलेल्या बिबट्याने पुन्हा उसाच्या शेतात धूम ठोकली मात्र शेतकऱ्याच्या पायाला बिबट्याने ओरबाडल्यामुळे जखम झाली.

Leopard Pune Otur
PMC Election: बेकायदा जाहिरातींचा खर्च थेट पक्षाच्या खात्यात; आयुक्त नवल किशोर राम यांचा इशारा

ओतूर (ता. जुन्नर) येथील रहाटीमळा येथे आज मंगळवारी ही घटना घडली असून विनोद बबन चौरे (वय 48 रा. ओतूर,(रहाटी मळा) असे बिबट्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

Leopard Pune Otur
Voter List Pune: मतदार याद्यांचा पेच कायम; इच्छुक उमेदवार आणि प्रशासन आमने-सामने

याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी ओतूर वनविभागाला कळविली असता वनपाल विश्वनाथ बेले, सारिका बुट्टे यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी तात्काळ धाव घेत जखमी विनोद यास ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

Leopard Pune Otur
Pune Theft Case: कामगार महिलांनीच मारला डल्ला; औंध-बाणेरमध्ये दोन घटनांत साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

दरम्यान शेतावर तसेच वाड्यावस्त्यांवर रहाणाऱ्या नागरिकांनी दिवसा व रात्रीच्या सुमारास विशेष काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

फोटो: शेतकऱ्याच्या पायाला झालेली जखम.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news