पालेभाज्या स्वस्त, तर भेंडी, वांगी, गवार तोर्‍यात

पालेभाज्या स्वस्त, तर भेंडी, वांगी, गवार तोर्‍यात

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : बाजारात सर्व पालेभाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्यात असून, भेंडी, वांगी, गवार आणि लसणाचे दर मात्र अद्याप तेजीतच आहेत. यासोबत सध्या मिरचीचे दर काळ्या मिरचीच्या तुलनेत दुप्पट आहेत. शहरातील मोशी उपबाजार, चिंचवड, आकुर्डी तसेच पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईतील किरकोळ बाजारात कोथिंबीर, मेथी, पालकचे दर प्रत्येकी 15 ते 20 रुपये जुडी तर भेंडी, वांगी, गवारचे 100 रुपये किलोने मिळत होती. लसूनही अद्यापही 250 रुपये पार आहे. काळी मिरची 60 तर साधी मिरचीची 120 रुपये प्रतिकिलोने विक्री होत असल्याची माहिती विक्रेते पोपट काळभोर यांनी दिली.

मोशी उपबाजारातील घाऊक दर : (प्रतिकिलो)

गाजर, 25 ते 30, वांगी 50 ते 60, शेवगा 70 ते 80, भेंडी 65 ते 70, गवार 70 ते 90, काकडी 15 ते 20, कांदा 15 ते 20, बटाटा 12 ते 15, टोमॅटो 15 ते 20, आले 65 ते 70, लसून 150 ते 160, मटार 30 ते 35.

मोशी उपबाजारातील आवक : (क्विंटल)

कांदा 408, बटाटा 604, आले 38, गाजर 252, गवार 9, शेवगा 18, गवार 9, हिरवी मिरची 145, टोमॅटो 499, काकडी 136, भेंडी 56. मोशी उपबाजारात पालेभाज्यांच्या एकूण 54 हजार 400 गड्डी, फळे 2 हजार 417 आणि फळ भाज्यांची आवक 3292 क्विंटल एवढी आवक झाली होती.

गवती चहाला मागणी :

थंडीत सर्वच कडक चहा घेणे पसंत करतात. मात्र, आयुर्वेदात गवती चहाचे सेवन करणे लाभदायक असल्याचे सांगितल्याने नागरिकांची गवती चहाला अधिक मागणी
वाढली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news