पुढारी वृत्तसेवा : अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी आठ जणांना अटक

Pimpri: Action for carrying a weapon
Pimpri: Action for carrying a weapon

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी वेगवेगळ्या कारवाईत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शनिवारी (दि. 7) संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या गुन्ह्यात अशोक मरिबा तुपेरे (22, रा. वाकड) याला अटक केली आहे. आरोपी अशोक याला पोलिसांनी 4 जानेवारी 2022 रोजी पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. मात्र, तडिपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहराच्या हद्दीत आला. याबाबत माहीती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

दुसर्‍या गुन्ह्यात ओंकार उर्फ बंटी सुनील लोखंडे (22, रा. चिंचवड) याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 200 रुपयांचा कोयता जप्त केला.

तिसर्‍या गुन्ह्यात सनी गौतम गवारे (20, रा. काळेवाडी) याला अटक केली आहे. पोलिसांनी च्याकडून 500 रुपये किमतीची एक पालघन जप्त केली आहे. चौथ्या गुन्ह्यात शुभम रामचंद्र पांचाळ (21, रा. रहाटणी) याला अटक केली आहे. त्याच्याकडून 100 रुपयांचा एक कोयता जप्त करण्यात आला आहे.

पाचव्या गुन्ह्यात हिंजवडी पोलिसांनी फ्रान्सिस भास्कर दास (29, रा. विनोदे वस्ती, वाकड. मूळ रा. वारजे माळवाडी, पुणे) याला अटक केली.

त्याच्याकडून 100 रुपये किमतीचा एक कोयता पोलिसांनी जप्त केला. सहाव्या गुन्ह्यात सांगवी येथे एक कारवाई करून विकास उर्फ विकी बाळू आडगळे (22, रा. ओटास्कीम, निगडी) याला अटक केली.

त्याच्याकडून देखील कोयता जप्त केला आहे. सातव्या गुन्ह्यात सांगवी पोलिसांनी केविन प्रकाश ब्राह्मणे (22, रा. पिंपळे गुरव) आणि इस्माईल अब्दुल रफिक शेख (24, रा. जुनी सांगवी) यांना अटक केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news