नऊ वर्षांनंतर चाकण टप्पा पाचचे भूसंपादन पूर्ण होणार..!

नऊ वर्षांनंतर चाकण टप्पा पाचचे भूसंपादन पूर्ण होणार..!
[author title="सुषमा नेहरकर-शिंदे " image="http://"][/author]
शिवनेरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ चाकण टप्पा क्रमांक पाचसाठी खेड तालुक्यातील सहा गावांतील 693.94 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार असून, आतापर्यंत 50 टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजे 398.86 हेक्टर क्षेत्र एमआयडीसीच्या ताब्यात आले आहे. अद्यापही 295 हेक्टर क्षेत्र ताब्यात आले नसून, हे क्षेत्र आता सक्तीने संपादित करण्यात येणार आहे. यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे अखेर नऊ वर्षांनंतर चाकण टप्पा पाचचे भूसंपादन पूर्ण होणार आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीवर सन 2004 पासूनच चाकण आंतरराष्ट्रीय विमानतळाचे शिक्के पडले होते.
जिल्ह्यातील चाकण, रांजणगाव, तळेगाव या औद्योगिक क्षेत्रात जमीन मिळावी यासाठी देशासह परदेशातील उद्योजकांची सर्वाधिक मागणी असते. त्यातही चाकण एमआयडीसीला उद्योजकांची सर्वाधिक पसंती असते. यामुळेच चाकण एमआयडीसीत एक नाही, दोन नाही तर तब्बल पाच टप्प्यात भूसंपादन करण्यात आले आहे.  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ चाकण टप्पा क्रमांक पाचसाठी खेड तालुक्यातील आंबेठाण, रोहकल, गोनवडी, बिरदवडी, चाकण आणि वाकी खुर्द या सहा गावांतील 693.94 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. शेतक-यांच्या संमतीने आतापर्यंत 296.66 हेक्टर संपादित करण्यात आले आहे. पंरतु आता शिल्लक क्षेत्रासाठी सक्तीने संपादित करण्यात येणार आहे. सक्तीने भूसंपादन करताना शेतकऱ्यांना शेतीसोबतच घरे, गुरांचे गोठे, फळझाडे यासाठी अधिकचे पैसे देण्यात येणार असल्याची माहिती खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी दिली. या सक्तीच्या भूसंपादनामुळे गेले नऊ वर्षांपासून रखडलेले चाकण टप्पा पाचचे भूसंपादन पूर्ण होणार आहे.
चाकण टप्पा पाचसाठी गेले अनेक वर्षांपासून भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. यासाठी शेतकर्‍यांच्या वारंवार बैठका घेऊन त्यांना कसा फायदा होईल याची माहिती  देण्यात आली. यामुळेच आता 50 टक्यांपेक्षा अधिक भूसंपादन झाले, परंतु आता सक्तीने भूसंपादन करण्यात येणार आहे.
– जोगेंद्र कट्यारे,  प्रांताधिकारी, खेड
चाकण टप्पा पाचसाठी प्रस्तावित व आत्तापर्यंत संपादित झालेले क्षेत्र व सक्तीने संपादित होणारे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
गाव           प्रस्तावित      संपादित      सक्तीने 
                   क्षेत्र             क्षेत्र        संपादित
आंबेठाण       249.89       120.51     69.8
रोहकल        178.68        86.24     58.5
गोनवडी         91.12         71.30     11.1
बिरदवडी        28.17        14.53     13.6
चाकण           88.73          4.06    84.7
वाकी खुर्द        57.35            0       57.35
एकूण            693.94      296.66     295.1 
हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news