काळजीची बाब ! शाळकरी मुलांमध्ये तंदुरुस्तीचा अभाव

काळजीची बाब ! शाळकरी मुलांमध्ये तंदुरुस्तीचा अभाव

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये तंदुरुस्ती, उत्तम आरोग्याचा अभाव असल्याचा निष्कर्ष एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. या देशव्यापी सर्वेक्षणात शाळकरी मुलांचा बॉडी मास इंडेक्स, अ‍ॅरोबिक क्षमता, अनअ‍ॅरोबिक क्षमता, कोअर स्ट्रेंथ, लवचिकता, शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागाची ताकद, अशा विविध मापदंडांच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले.
सर्वेक्षणात देशातील 250 शहरांतील आणि गावांमधील शाळांमधील 7 ते 17 वर्षे वयोगटातील 73 हजारांहून अधिक मुलांचा समावेश होता. साप्ताहिक शारीरिक शिक्षणाच्या तासांची वारंवारिता मुलांच्या आरोग्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, असेही सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे मुलांच्या दैनंदिन आयुष्यात शारीरिक कसरतींचा नियमित समावेश करण्याच्या महत्त्वावर भर देणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

मुली आणि मुलांमधील शारीरिक तंदुरुस्तीतील लक्षणीय फरकदेखील स्पष्टपणे दिसून आला आहे. मुलींमध्ये बॉडी मास इंडेक्सचे (बीएमआय) प्रमाण मुलांपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे. मुलींमध्ये हे प्रमाण 62 टक्के आहे, तर त्या तुलनेत मुलांचे प्रमाण
कमी आहे. खासगी शाळांमधील मुले सरकारी शाळांमधील मुलांच्या तुलनेत सरस आहेत. खासगी शाळांमधील मुलांचे प्रमाण 43 टक्के, तर सरकारी शाळांमधील मुलांचे प्रमाण 31 टक्के आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news