NCP MLA Disqualification Case | राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण : निकाल देण्यासाठी राहुल नार्वेकरांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ | पुढारी

NCP MLA Disqualification Case | राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण : निकाल देण्यासाठी राहुल नार्वेकरांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Maharashtra Assembly Speaker Rahul Narwekar) यांना निकाल देण्यासाठी १५ दिवसांची मुदत वाढवून दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणी पूर्ण करून निकाल देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना ३१ जानेवारी ही अंतिम मुदत दिली होती. आता ही मुदत वाढवून १५ फेब्रवारीपर्यंत दिली आहे.
३१ जानेवारी रोजी अंतिम आदेशासाठी कार्यवाही बंद केली जाईल आणि निकाल देण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत वेळ वाढवून देत असल्याचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी म्हटले आहे. (NCP MLA Disqualification Case)

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याच्या मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या याचिकेवर अंतिम आदेश देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

२५ जानेवारी रोजीच्या आदेशात विधानसभा अध्यक्षांना सूचित केले आहे की प्रतिवादींच्या साक्षीदारांची उलटतपासणी पूर्ण होऊ शकली नाही आणि पक्षांच्या संमतीने वेळापत्रक विहित केले आहे आणि या प्रकरणाची कार्यवाही ३१ जानेवारी रोजी आदेशासाठी पूर्ण करावी आणि निकाल पूर्ण करण्यासाठी आम्ही १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत वेळ देतो, असे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे.

निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर ताबा कोणाचा? यासंदर्भात सुनावण्या झाल्या. दोन्ही बाजू पूर्णपणे ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने आपला निकाल राखीव ठेवला आहे. ८ डिसेंबर २०२३ रोजी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणीसाठी विधानसभा अध्यक्षांना ३१ जानेवारी ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि पक्षाचे कोणाचे यावर निवडणूक आयोगाचा निर्णय अद्याप पर्यंत जाहीर करण्यात आलेला नाही.

 हे ही वाचा :

 

Back to top button