Kusegaon accident: कुसेगावमध्ये दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; नातेवाईकांचा पोलिसांवर आक्रोश

गुन्हा दाखल होण्यासाठी १४ तास प्रतीक्षा, मृतदेह थेट पोलिस चौकीबाहेर आणला
Kusegaon accident
कुसेगावमध्ये दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; नातेवाईकांचा पोलिसांवर आक्रोशPudhari
Published on
Updated on

पाटस : कुसेगाव (ता. दौंड) येथील गणेश भानुदास कोकाटे या तरुणाचा अपघाती मृत्यू रविवारी (दि. २८) दुपारी १२ वाजता झाला; मात्र सोमवारी (दि. २९) पहाटेच्या २ वाजता मृतदेह रुग्णवाहिकेतून पाटस पोलिस चौकीबाहेर कोकाटे कुटुंबीयांनी आणत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांनी हाती घेतल्याची घटना घडली. (Latest Pune News)

Kusegaon accident
ST bus accident: भरधाव एसटी बस खड्ड्यात; सुदैवाने अपघात टळला

कुसेगाव (ता. दौंड) येथील गणेश भानुदास कोकाटे (वय अंदाजे ३२) या तरुणाचा पाटस–अष्टविनायक रोडवर झालेल्या दुचाकी व चारचाकी वाहनाच्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली; मात्र गुन्हा दाखल होण्यासाठी तब्बल १४ तासांची वाट पहावी लागली.

Kusegaon accident
World Heart Day 2025: फिटनेस असूनही हृदयविकाराचा धोका!

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कोकाटे हे कामानिमित्त कुसेगाव येथून पाटसकडे दुचाकी गाडीने (एमएच ४२ एसी ४१६७) जात होते. दरम्यान कुसेगाव हद्दीतील मोरे वस्ती जवळ पाटसहून भरधाव वेगात येणाऱ्या चारचाकीने (एमएच ४२ बीएन ९६९३) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत कोकाटे चारचाकीच्या काचेवर आपटून गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर गाडी चालकाने वाहन जागीच सोडून पळ काढल्याने कोकाटे यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यास उशीर झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत केली व त्यांना पुढे उपचारासाठी पाठवले. मात्र, पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Kusegaon accident
Education Degree Admissions: शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांना घरघर, बी.एड-एम.एडला पसंती कमी

या अपघाताची माहिती मिळताच कुसेगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. दरम्यान, मृतदेह ससून रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर नातेवाईकांनी तो थेट न्याय मिळवण्यासाठी पाटस पोलिस चौकीबाहेर न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई करावी, अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कुटुंबियाने केली आहे.

“सरळ रस्त्याने जात असताना समोरून येणाऱ्या गाडीने धडक दिली. आमची काय चूक? आम्हाला न्याय द्या,” असा प्रश्न गणेश कोकाटे यांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.

Kusegaon accident
Chakan vegetable market: चाकण बाजारात बटाटा, लसूण, मिरचीचे दर वधारले

दरम्यान, कोकाटे कुटुंबीय व नातेवाईकांनी मृतदेह पोलिस चौकीसमोर आणल्यानंतर नातेवाईकांचा मोठा जमाव जमा झाला. त्यानंतरच पोलिसांनी हलकल्लोळाच्या पार्श्वभूमीवर रात्री सव्वा दोनच्या सुमारास गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले.

या घटनेमुळे "अपघातानंतर गुन्हा तातडीने का दाखल झाला नाही?" असा प्रश्न उपस्थित होत असून, पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गावात या प्रकरणावर तीव्र चर्चा रंगली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास यवत पोलिस ठाण्याच्या अंतर्गत सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news