

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये बटाटा, लसूण व हिरव्या मिरचीच्या दरात वाढ झाली. नवरात्रीच्या उपवासामुळे बाजारात रताळ्याची उच्चांकी 30 टन आवक झाली. पालेभाज्यांची भरपूर आवक झाल्याने भाव कोसळले. राजगुरुनगर येथील बाजारात ढोबळी मिरची, वालवड, काकडी, टोमॅटो, वाटाणा व कोबी यांची मोठी आवक झाली. एकूण उलाढाल 4 कोटी 10 लाख रुपये झाली.(Latest Pune News)
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 750 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 300 क्विंटलने घटून कांद्याच्या भावात 200 रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल 1500 रुपयांवरून 1300 रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक 2000 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक स्थिर राहून भावात 200 रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव 1800 रुपयांवरून 2000 रुपयांवर पोहोचला.
लसणाची एकूण आवक 40 क्विंटल झाली. लसनाला 8 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 377 क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला 2 हजार 500 रुपयांपासून 3 हजार 500 रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे: कांदा - एकूण आवक - 750 क्विंटल. भाव क्र 1- 1300 रुपये, भाव क्र. 2 - 1000 रुपये, भाव क्र. 3 - 800. बटाटा - एकूण आवक - 2000 क्विंटल. भाव क्र. 1 - 2000 रुपये, भाव क्र.2 - 1600 रुपये, भाव क्र. 3 - 1200 रुपये.
फळभाज्या : फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोला मिळालेला दर कंसात : टोमॅटो - 278 क्विंटल (1000 ते 1800), कोबी - 195 क्विंटल (800 ते 1500), फ्लॉवर - 237 क्विंटल (800 ते 1200), वांगी - 72 क्विंटल (3000 ते 4000), भेंडी - 93 क्विंटल (4000 ते 6000), दोडका - 48 क्विंटल (3500 ते 4500), कारली - 71 क्विंटल (2500 ते 3500), दुधीभोपळा - 52 क्विंटल (1000 ते 2000), काकडी - 78 ( क्विंटल (800 ते 1200), फरशी - 28 क्विंटल (4000 ते 5,000,
वालवड - 64 क्विंटल (3000 ते 4000), ढोबळी मिरची - 156 क्विंटल (3000 ते 5000), चवळी - 48 क्विंटल (2500 ते 3500), वाटाणा - 60 क्विंटल (8000 ते 12000), शेवगा - 22 क्विंटल (6000 ते 10000), गाजर - 125 क्विंटल (2000 ते 3000), गवार - 18 क्विंटल (7000 ते 10000), आले - 195 क्विंटल ( 3000 ते 4000), ओली भुईमूग शेंग - 120 क्विंटल (4000 ते 5500), शेवगा - 24 क्विंटल (6000 ते 9000), रताळी - 145 क्विंटल (2000 ते 3000).
चाकण बाजारात रताळ्यांची झालेली आवक.