ST bus accident: भरधाव एसटी बस खड्ड्यात; सुदैवाने अपघात टळला

कडुस-कोहिंडे बुद्रुक रस्त्यावर घाट उतारावर बसचा वेग सुटला, प्रवासी सुरक्षित बाहेर काढले
ST bus accident
एस टी बस वेगात जाऊन बाजूच्या चारीत खड्ड्यात गेलीPudhari
Published on
Updated on

कडुस : कडुस-कोहिंडे बुद्रुक रस्त्यावर कङूस गावाजवळील पाझर तलावा जवळील घाट उतारावर भरधाव येणाऱ्या एसटी बस (एमएच १४ बीटी ४७१९) चालकाचे नियंत्रण सुटल्याने एस टी बस वेगात जाऊन बाजूच्या चारीत खड्ड्यात गेली. प्रवाशी, विद्यार्थीना आपत्कालिन मार्ग तसेच चालकाच्या बाजूचा दरवाजा उघडून बाहेर काढण्यात आले.(Latest Pune News)

ST bus accident
World Heart Day 2025: फिटनेस असूनही हृदयविकाराचा धोका!

मुक्कामी खरपूर गावावरून आलेली एसटी बस होती. या एसटी बसमध्ये सुमारे ४३ प्रवासी होते. यामध्ये विद्यार्थी व वृद्ध नागरिक होते. एसटी बसचा वेग इतका होता समोरून आलेल्या एसटी बस चालकाने शिताफिने आपली एसटी बस बाजूला घेतली;अन्यथा समोरासमोर दोन एसटी बसचा अपघात झाला असता; मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news