Engineering Admission 2026 Schedule: अभियांत्रिकी प्रवेशासाठी सीईटी सेलचे वेळापत्रक जाहीर; नोंदणीची मुदत १९ जुलैपर्यंत

२ लाख ६१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी; २८ जुलैपासून पहिली कॅप फेरी, १५ सप्टेंबरला प्रवेश प्रक्रिया पूर्ण
Admission
AdmissionPudhari
Published on
Updated on

पुणे: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलतर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी तंत्रशिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी प्रवेश नोंदणीच्या मुदतवाढीसह प्रवेशाचे संपूर्ण वेळापत्रक सीईटी कक्षाने जाहीर केले आहे.

Admission
Pune Waste Processing Project Tipping Fee: पुणे कचरा प्रकल्पाच्या ९४३ रुपये टिपिंग शुल्काला ब्रेक; महापालिकेने भूमी ग्रीनला दिली दर कमी करण्याची सूचना

त्यानुसार प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख १९ जुलैपर्यंत आहे. प्रवेशाची पहिली फेरी २८ जुलैपासून रोजी सुरू होणार असून, संपूर्ण प्रवेशप्रक्रिया १५ सप्टेंबरला संपणार आहे. अभियांत्रिकी या अभ्यासक्रमाच्या केंद्रिभूत प्रवेशाची नोंदणी २ जुलैपासून सुरू झाली असून, १९ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.

Admission
Pune Municipal Waste Processing Tender Controversy: पुणे महापालिकेच्या कचरा निविदेवरून वाद पेटला; ‘विशिष्ट कंपनीला फायदा’ देण्याचा विरोधकांचा आरोप

या अभ्यासक्रमास आजपर्यंत २ लाख ६१ हजार ६६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मागील वर्षी २०२५-२६ साली २ लाख २५ हजार ४४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत व कागदपत्रांच्या पडताळणीसाठी 'ई-पडताळणी' किंवा 'प्रत्यक्ष पडताळणी' या पद्धतीपैकी कोणत्याही एका पद्धतीची निवड करावी.

Admission
Tukaram Mundhe Autobiography Launch: आईच्या आठवणीने तुकाराम मुंढे भावुक; आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्यात उसळली चाहत्यांची गर्दी

अशाप्रकारे कॅप प्रवेशाच्या एकूण ४ फेऱ्या होतील. यानंतर संस्थास्तरीय प्रवेश होतील. प्रवेशाच्या सर्व प्रक्रिया १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

Admission
Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडाला एक महिना; अपघातातून उलगडलेल्या कटाची धक्कादायक कहाणी, डिजिटल पुराव्यांनी उघडले रहस्य

अभियांत्रिकी प्रवेशाचे असे आहे वेळापत्रक

  • प्रवेशासाठी संकेतस्थळावर अर्जाची ऑनलाईन नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे - २ ते १९ जुलै

  • प्रवेशासाठीच्या अर्जाची पडताळणी व अर्जाची निश्चिती - ३ ते २० जुलै

  • तात्पुरती गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रदर्शित करणे - २२ जुलै

  • विद्यार्थ्यांच्या तक्रारी (असल्यास) सादर करणे - २३ ते २५ जुलै

  • अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रदर्शित करणे - २७ जुलै

  • कॅप फेरी १ साठी प्रवर्गनिहाय तात्पुरत्या जागांचे प्रदर्शन करणे (सीट मॅट्रिक्स) - २७ जुलै

  • कॅप फेरी-१ च्या विकल्प अर्जाचे ऑनलाईन सादरीकरण आणि निश्चितीकरण - २८ ते ३० जुलै

  • कॅप फेरी-१ च्या तात्पुरत्या जागांचे वाटप - २ ऑगस्ट

  • कॅप फेरी १ मधील जागा वाटपानुसार जागा स्वीकारणे - ३ ते ५ ऑगस्ट

  • कॅपफेरी १ नंतर, नेमून दिलेल्या संस्थेत उपस्थित राहणे आणि आवश्यक कागदपत्रे सादर करून व शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे - ३ ते ५ ऑगस्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news