Kunbi Certificate Scam: कुणबी दाखल्यासाठी 70 रुपयांवरून थेट 20 हजार मागणी! मंचरमध्ये उमेदवारांचे होरपळ

एजंट व ई-सेवा केंद्रांकडून उघड लूट; दाखला नसल्यास अर्ज ग्राह्य नाही—उमेदवार त्रस्त, प्रशासनाकडे चौकशीची मागणी
Kunbi Certificate Scam
Kunbi Certificate ScamPudhari
Published on
Updated on

मंचर: मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी काही प्रभागांमधील आरक्षणानुसार नगरसेवक पदासाठी कुणबी दाखला अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच नगराध्यक्ष पद ओबीसी राखीव जाहीर झाल्यामुळे संबंधित उमेदवारांकडून आवश्यक कागदपत्रांच्या मागणीत वाढ झाली आहे.

Kunbi Certificate Scam
New Voters Impact: सासवडमध्ये नवमतदारांची लाट! 33 हजार 656 मतांनी कोणाचे गणित बिघडणार?

मात्र कुणबी दाखला काढून देण्याच्या प्रक्रियेत काही एजंट आणि महा-ई-सेवा केंद्रे अवाजवी पैशांची मागणी करू लागले आहेत. या प्रकारामुळे इच्छुक उमेदवार हैराण झाले आहेत.

Kunbi Certificate Scam
Pune Fruit Market Rates: मोसंबीचा आंबेबहार बहरला; पुणे बाजारात आवक वाढली

उमेदवारी फॉर्म भरण्याची मुदत सोमवार (दि. 17)पर्यंत असल्याने उमेदवारांकडून मोठी धावपळ सुरू आहे. अर्ज दाखल करताना कुणबी दाखला जोडणे बंधनकारक असल्याचा गैरफायदा घेत काही केंद्रांनी शुल्काचे शासकीय दर 70 रुपये ऐवजी मनमानीपणे वाढवले. त्यानुसार 5 हजार ते 20 हजार रुपयांपर्यंत पैसे घेतले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Kunbi Certificate Scam
MIDC Midnight Raid: बारामती MIDC मध्ये मध्यरात्री धडक छापा! केमिकलच्या सॅम्पलमुळे खळबळ

अनेक उमेदवारांनी या संदर्भात तत्काळ चौकशी करून कठोर कारवाईची मागणी प्रशासनाकडे केली आहे. वाढत्या आर्थिक शोषणामुळे प्रामाणिक उमेदवारांना अर्ज भरणेही कठीण झाले आहे.

Kunbi Certificate Scam
Pune Vegetable Price: पुण्यात राजस्थानी गाजरांची मोठी आवक; भाज्यांच्या दरात वाढ

कुणबी दाखला मिळण्यासाठी अतिरिक्त पैसे मागितले जात आहेत. सरकारी दर वेगळा आणि प्रत्यक्ष मागणी वेगळी म्हणजे आवाजवी असल्याने आम्ही अस्वस्थ आहोत. प्रशासनाने लगेच हस्तक्षेप करून ही आर्थिक लूट थांबवावी.

प्रमोद बाणखेले, अध्यक्ष.

भाजपा उद्योग आघाडी, उत्तर पुणे जिल्हा.कुणबी दाखला घेण्यासाठी नियमानुसारच उमेदवारांनी किंवा इतर नागरिकांनी पैसे द्यावे. जर कोणी अडवणूक करून पैसे घेत असेल तर त्याची लेखी तक्रार तहसील कार्यालयात द्यावी. त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.

संजय नागटिळक, तहसीलदार, आंबेगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news