पुणे : पाणीपट्टी वसुली 512 कोटी; कृष्णा खोरे विकास महामंडळ अव्वल

पुणे : पाणीपट्टी वसुली 512 कोटी; कृष्णा खोरे विकास महामंडळ अव्वल
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सिंचन विभाग वेगवेगळ्या कारणांवरून नेहमीच चर्चेत असतो. यंदा मात्र तो बिगर सिंचनाच्या पाणीपट्टी वसुलीत विक्रमी झेप घेतल्याच्या कारणावरून चर्चेत आला आहे. यंदाच्या 513.01 कोटीच्या उद्दिष्टापैकी 512.40 कोटी रुपयांची वसुली करीत इतर महामंडळांच्या तुलनेत कृष्णा खोरे विकास महामंडळ अव्वल ठरले आहे.

कृष्णा खोरे विकास महामंडळ अस्तित्वात आल्यानंतर कार्यकारी संचालकपदावर कायमस्वरूपी अधिकारी नसला, तरी मुख्य अभियंत्यांच्या आदेशानुसार सर्वच विभागप्रमुखांनी शेतकर्‍यांना योग्य वेळी व योग्य प्रमाणात पाणी पुरविले. त्याचबरोबर बिगरसिंचनासाठी राखीव असलेल्या पाण्याचे नियोजन करीत योग्य प्रमाणात संबंधित आस्थापनांना वितरितही केले. ज्याप्रमाणे पाण्याचे वितरण केले. तसेच, काम पाणीपट्टीवसुलीतही केल्याचे आकडेवारीवरून दिसून आले. 2022-23 च्या पाणीपट्टी उद्दिष्टाला मुदतीच्या आत पूर्ण करून इतर महामंडळांच्या तुलनेत आघाडी कायम ठेवली आहे.

कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर आणि धाराशिव या जिल्ह्यांतील कुकडीचा काही भाग सिंचनाखाली येतो. यापैकी सांगली, कोल्हापूर, सातारा आणि पुणे या मंडळास 438.01 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी या मंडळांनी 434.84 कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यात यश मिळविले, तर कुकडी व कडा या मंडळांना 75 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या मंडळांनी उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजेच 77.56 कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यात यश मिळविले आहे.

  • मागील वर्षी 400 कोटींची पाणीपट्टी वसुली
  • मागील वर्षापेक्षा सुमारे 100 कोटींहून अधिक वसुली
  • अजूनही बहुतांश आस्थापनांकडे रखडली कोट्यवधीची पाणीपट्टी

मागील वर्षी 400 कोटींचे पाणीपट्टीवसुलीचे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण केल्याने यंदा 513.1 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. सर्वच विभागांनी बिगर सिंचन पाणीपट्टीवसुलीत आपला दबदबा कायम ठेवला आहे.

                                  – हनुमंत गुणाले, मुख्य अभियंता,
                                 कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news