

पुणे: मागील काही निवडणुकांपासून भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोथरुड मतदारसंघात यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजपला संमिश्र प्रतिसाद मिळाला. कोथरूड–बावधन क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १० मध्ये भाजपने आपले वर्चस्व कायम राखत विजय मिळविला. मात्र, प्रभाग क्रमांक ११ मध्ये भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे या भागात 'कही खुशी काही गम' अशी स्थिती पाहायला मिळाली.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी कोथरूड–बावधनमधील तिन्ही प्रभागांत गुरुवारी सरासरी ५४.५३ टक्के मतदान झाले होते. शुक्रवारी सकाळी मतमोजणीस सुरुवात होण्यापूर्वीच मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. सकाळी टपाल मतदानाची मतमोजणी करण्यात आली. त्यामध्ये प्रभाग क्रमांक ११ मध्ये एकूण ३६ टपाल मते नोंदविण्यात आली. यानंतर ईव्हीएमवरील मतमोजणीला प्रारंभ झाला. प्रभाग क्रमांक १० (बावधन–भुसारी कॉलनी) या प्रभागांत भाजपच्या उमेदवारांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. प्रत्येक फेरीत आघाडी वाढत गेली आणि चारही जागांवर भाजपचे उमेदवार दणदणीत मताधिक्याने विजयी झाले. निकाल स्पष्ट होताच भाजप कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्र परिसरात गुलाल उधळून जल्लोष केला.
प्रभाग क्रमांक 10 मधील सविस्तर निकाल
प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले. किरण दगडे, रूपाली पवार, अल्पना वरपे आणि दिलीप वेडे पाटील हे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले.
प्रभाग १० अ
गोरडे राजाभाऊ केशव मनसे - 4885
अभिजीत राजेंद्र दगडे राष्ट्रवादी (अप) - 9183
किरण दगडे पाटील भाजप- 29211
ब)
आरती विलास करंजावणे आप -1322
पवार रुपाली सचिन भाजप - 23649
मिनल निलेश धनवटे शिंदेसेना- 1269
जयश्री गजानन मारणे राष्ट्रवादी (अप) - 11943
वेडेपाटील स्वाती राजेंद्र मनसे -4242
वैशाली सुरेंद्र कंधारे अपक्ष - 384
क
गायकवाड पौर्णीमा नितीन मनसे - 3152
भुंडे सुजाता सुर्यकांत राष्ट्रवादी (अप) -9306
सुरेखा किशोर मारणे काँग्रेस -:16555
वरपे अल्पना गणेश भाजप - 28216
मंगल दादाराव सोनटक्के शिंदेसेना - 743
ड
उभे रमेश निवृत्ती शिंदेसेना -1306
केमसे शंकर राष्ट्रवादी (अप) - 12082
ॲड. कृणाल नारायण घारे आप -923
राहुल गजानन दुधाळे उद्धवसेना - 3770
वेडे पाटील दिलीप तुकाराम भाजप - 24734
आढागळे किरण रामचंद्र अपक्ष -188
किरण सुधाकर इंगळे अपक्ष -144
सचिन दत्तात्रय धनकुडे अपक्ष - 90
इंजिनिअर महेश दशरथ म्हस्के अपक्ष -42
निलेश शंकर वाघमारे अपक्ष -119
चंद्रकांत वामन शिंदे अपक्ष -139
प्रभाग क्रमांक ११ मध्ये चित्र वेगळे राहिले. या प्रभागात भाजपचा केवळ एक उमेदवार निवडून आला. उर्वरित जागांवर काँग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये भाजप उमेदवाराने आघाडी घेतली होती. मात्र, पुढील फेऱ्यांमध्ये विरोधकांनी जोरदार मुसंडी मारत निकाल आपल्या बाजूने वळविला.
प्रभाग क्रमांक 11 मधील सविस्तर निकाल
प्रभाग ११ अ
संतोष गणपत काते आप - 1347
बाळासाहेब मनोहर धनवडे उद्धवसेना - 2797
हर्षवर्धन दीपक मानकर राष्ट्रवादी (अप) - 19126
अजय नामदेव मारणे भाजप - 15297
ब)
जयश्री संदीप डिंबळे आप - 694
डोख दीपाली संतोष काँग्रेस - 12535
भगत सविता दत्ता शिंदेसेना - 1852
तृप्ती निलेश शिंदे राष्ट्रवादी (अप) -10130
शर्मिला नितिन शिंदे भाजप - 11408
शुभांगी बाळासाहेब खंकाळ वंचित -432
गायकवाड दिपाली दत्तात्रय अपक्ष - 277
अनिता विवेक तलाठी अपक्ष - 1757
क)
कांता नवनाथ खिलारे राष्ट्रवादी (अप) - 7027
ॲड. वर्षा महादेव चव्हाण आप - 343
बुटाला मनिषा संदीप भाजप - 12789
वैशाली राजेंद्र मराठे शिंदेसेना - 4428
शिंदे स्नेहल गणेश मनसे - 2756
सोनार नयना शिवाजी काँग्रेस -11515
पुजा भुषण शिर्के अपक्ष -387
ड)
ॲड. रामचंद्र उर्फ चंदुशेठ आत्माराम कदम काँग्रेस - 23712
पवार नितीन रामदास शिंदेसेना - 1529
अर्चना सागर भगत मनसे - 1608
ॲड दत्तात्रय बिभीषण भांगे - 268 आप
अभिजीत भागवत राऊत भाजप - 11631
दिपक पांडुरंग कांबळे वंचित -276
शेंडगे दत्ता नाना इतर पक्ष -80
शैलेश शिवाजी ढमाले अपक्ष -43
जयदीप पडवळ अपक्ष - 248
इंजिनिअर महेश दशरथ म्हस्के अपक्ष - 76
प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी शिवतीर्थनगरमधून राष्ट्रवादी (अ. प.) चे हर्षवर्धन मानकर, काँग्रेसच्या दीपाली डोख, रामचंद्र कदम आणि भाजपच्या मनीषा बुटाला निवडून आल्या. निकालाचे चित्र स्पष्ट होताच पराभूत उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्रातून माघार घेतल्याचे दिसून आले. एकीकडे विजयाचा उत्साह, तर दुसरीकडे अपयशाची जाणीव अशा मिश्र भावनांच्या वातावरणात कोथरूडमधील निवडणूक निकाल लागले. भाजपचा गड असला तरी मतदारांनी दिलेला हा संमिश्र कौल पुढील राजकीय वाटचालीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
फेर मतमोजणीची मागणी
प्रभाग क्रमांक ११ कमधील काँग्रेसच्या उमेदवार नयना सोनार यांनी मतमोजणीदरम्यान प्रशासनाने चुकीची आकडेवारी दिली असल्याचे सांगितले. यामुळे काही काळ मतमोजणी केंद्रावर गोंधळ उडाला होता. मात्र, प्रशासनाने वेळीच मागणी ऐकून काही मतदान यंत्राची परत मोजणी केली. त्यानंतर वातावरण निवळले. भाजपच्या मनीषा बुटाला याना १ हजार २७४ मतांनी विजयी घोषित करण्यात आले.
मतदान यंत्र सेट केल्याचा आरोप रामबाग कॉलनी भागात राहत असून, अनेक वर्षे सामाजिक काम करत आहेत. येथील काही मतदान केंद्रांवर एकही मत मला मिळाले नाही, हे होऊच शकत नाही. त्यामुळे ही मतदान यंत्रे सेट केली असून, कोणी हे मला माहीत नाही. माझा मतमोजणीवर बहिष्कार आहे.
अनिता तलाठी, अपक्ष उमेदवार, प्रभाग क्रमांक ११ ब