

टाकळी भीमा: कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वेळी जय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. या पार्श्वभूमीवर या परिसरात कुठली राजकीय किंवा धार्मिक सभा घेता येणार नाही.
सोशल मीडियावर देखील पोलिसांचे बारकाईने लक्ष असणार आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या दिवशी कायद्याचे पालन करावे, असे आवाहन शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी केले आहे.
शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी 1 जानेवारी रोजी होणाऱ्या शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव ढमढेरे येथे घेतलेल्या बैठकीत गायकवाड बोलत होते. ते म्हणाले 1 जानेवारीला कोरेगाव भीमा येथे पोलिसांकडून तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी 7 अपर पोलिस अधीक्षक 25 उपविभागीय पोलिस अधिकारी, 69 पोलिस निरीक्षक, 270 पोलिस उपनिरीक्षक आणि 3010 पोलिस अंमलदार आणि 1500 होमगार्ड असे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कोरेगाव भीमा परिसरात बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत.
या वेळी त्यांनी परिसारत आक्षेपार्ह फ्लेक्स बोर्ड लावू नयेत, उसाच्या ट्रॅक्टरची वाहतूक आणि गावातील इतर वाहतूक पर्याय मार्गाने वळविण्यात यावी. परिसरात गर्दी करू नये, 31 डिसेंबर साजरा करताना कायद्याचे पालन करावे, परिसरात शांतता राखून प्रशासनास सहकार्य करण्यात यावे अशा सूचनाही गायकवाड यांनी दिल्या.
या बैठकीस शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग््रेास शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, आरपीआय अध्यक्ष नवनाथ कांबळे, शिक्रापूर पोलिस ठाण्याचे गोपनीय विभागाचे संदीप कारंडे, तळेगाव ढमढेरेच्या सरपंच रोहिणी तोडकर, उपसरपंच गोविंद ढमढेरे, ग््राामसेवक राजेंद्र सात्रस, माऊली अल्हाट, तंटामुक्ती अध्यक्ष किशोर रासकर, विशाल अवचिते, पोलिस पाटील पांडुरंग नरके व ग््राामस्थ उपस्थित होते. हवालदार किशोर तेलंग यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच गोविंद ढमढेरे यांनी आभार मानले.