Sahyadri Hospital: ‘सह्याद्री’कडून महापालिकेच्या नियमांचा भंग नाही; कोकण मित्र मंडळ ट्रस्टतर्फे खुलासा सादर

कोकण मित्र मंडळ ट्रस्टतर्फे खुलासा करण्यात आला असून, कोणत्याही नियमांचा भंग केला नसल्याचे नमूद केले आहे.
Sahyadri Hospital
‘सह्याद्री’कडून महापालिकेच्या नियमांचा भंग नाही; कोकण मित्र मंडळ ट्रस्टतर्फे खुलासा सादरPudhari
Published on
Updated on

पुणे: सह्याद्री रुग्णालय समूहातील बहुतेक समभाग मणिपाल ग्रुपकडे हस्तांतरित झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. अ‍ॅड. सुश्रुत कांबळे यांनी पाठवलेल्या पत्रानुसार व्यवहारांमध्ये नियमभंग झाल्याच्या आरोपावर खुलासा करण्यास सांगण्यात आले होते. याबाबत कोकण मित्र मंडळ ट्रस्टतर्फे खुलासा करण्यात आला असून, कोणत्याही नियमांचा भंग केला नसल्याचे नमूद केले आहे.

महापालिकेने अ‍ॅड. सुश्रुत कांबळे यांच्या पत्राचा आधार घेत कोकण मित्र मंडळ ट्रस्टला कागदपत्रे आणि खुलासा सादर करण्याची नोटीस पाठवली होती. याबाबत कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टने महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकार्‍यांकडे तपशीलवार पत्र पाठवले आहे. यामध्ये महापालिकेने दिलेली जमीन, मोफत उपचार यांवर भाष्य करण्यात आले आहे. (Latest Pune News)

Sahyadri Hospital
Pune Illegal Stalls: कारवाईनंतरही अतिक्रमण जैसे-थे! पथक गेल्यावर पुन्हा थाटली जातात दुकाने

पत्रात नमूद केल्यानुसार, पुणे महापालिकेने कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टला 27 फेब—ुवारी 1998 रोजी जमीन आडेपट्टा कराराद्वारे दिलेली आहे. जमिनीची किंवा त्यावरील रुग्णालयाच्या इमारतीची मालकी कधीही ट्रस्टने एव्हरस्टोन कॅपिटल किंवा ऑटारियों टीचर्स पैशन प्लॅन यांना अगर अन्य कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थांना हस्तांतरित केलेली नाही. ही जमीन आजही महापालिकेच्या मालकीची आहे आणि जमिनीवर बांधलेली रुग्णालयाची इमारत ही ट्रस्टच्या मालकीची आहे.

जमिनीवर बांधलेल्या रुग्णालयास 2004 मध्ये दिलेला नर्सिंग होम परवाना अजूनही ट्रस्टच्याच नावावर असून रुग्णालय प्रमुखाच्या नावात व खाटांच्या संख्येत वेळोवेळी झालेले बदल महापालिकेच्या कार्यालयाच्या परवानगीने करण्यात आलेले आहेत. याबाबतचा परवान्याची प्रत महापालिकेला सादर करण्यात आली आहे. ही मिळकत ट्रस्टने मणिपाल हॉस्पिटल समूह अगर अन्य कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेस हस्तांतरित केलेली नाही.

Sahyadri Hospital
Pune News: इच्छुकांसाठी महापालिकेचा स्वतंत्र कक्ष; ना हरकत प्रमाणपत्र घेणे होणार सुलभ

उपचारांबाबत काय म्हणणे?

ट्रस्टतर्फे महापालिकेच्या विनामूल्य बेडच्या अटी व दिवसांच्या अंमलबजावणीचे पूर्णपणे पालन केले जात असल्याचे पत्रामध्ये कळवण्यात आले आहे. महापालिकेकडून शिफारस केलेल्या कोणत्याही रुग्णास विनामूल्य उपचार देण्यास नकार दिला जात नाही. मनपाकडून शिफारसपत्र प्राप्त झाल्यावर सर्व रुग्णांसाठी विनामूल्य खाटा उपलब्ध करून दिल्या जातात.

सह्याद्री हॉस्पिटलमध्ये मागील तीन आर्थिक वर्षांमध्ये एकूण 500 बेड डेज उपचार केलेले आहेत. करारातील अटीनुसार उपलब्ध करून द्यावयाच्या 50 बेडडेज पेक्षा कितीतरी जास्त म्हणजेच वर्षाकाठी सरासरी 166 दिवस ट्रस्टने मनपाकडून शिफारस केलेल्या रुग्णांना आरोग्यसेवा पुरवलेली आहे, असा खुलासा कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टच्या वतीने जनरल सेक्रेटरी महेश कुलकर्णी यांनी पाठवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news