Road Tar Issue: कोंढवा गावठाणात सिमेंट रस्त्यावर डांबराचा थर; नागरिक संतप्त

रस्त्याची स्थिती चांगली असतानाही महापालिकेचा अजब कारभार; माजी नगरसेवक आणि ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला
Road Tar Issue
Road Tar IssuePudhari
Published on
Updated on

कोंढवा: कोंढवा गावठाणातील सुस्थितीत असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या मुख्य रस्त्यावर महापालिका प्रशासनाने चक्क डांबराचा थर पसरला आहे. महापालिकेच्या अजब कारभारावर रडावे की हसावे, अशी स्थिती ग््राामस्थांची झाली आहे.

Road Tar Issue
Road Quality Action: वारजेतील निकृष्ट डांबरीकरणानंतर महापालिकेत खळबळ; आयुक्तांचा ‘मिशन मोड’ इशारा

कोंढवा खुर्द येथील मुख्य गावठाण रस्ता हा तीन-चार वर्षांपूर्वी सिमेंट काँक्रीटचा बनविण्यात आला आहे. सध्याची रस्त्याची स्थिती सुव्यवस्थेत असताना देखील, रात्रीच्यावेळी पालिका प्रशासनाने चक्क सिमेंटच्या रस्त्यावर डांबर टाकून, लोकांवर विचार करण्याची वेळ आणली आहे. याच परिसरातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी व अपघात होत आहेत.

Road Tar Issue
Bibta Attack: बिबट्यांच्या हल्ल्यांवर ‘शेळी उपाय’; शेतकऱ्यांमध्ये नाराजी, शासनावर टीका

हे रस्ते करा म्हटलं की, प्लांट बंद आहे, गाड्या मिळत नाहीत. बजेट नाही, असे अनेक प्रकार पालिका अधिकारी सांगत आहेत. सर्वसामान्य लोकांच्या पैशांचा चुराडा कसा करावा. हे महापालिका अधिकाऱ्यांकडून शिकायला हवे, असा संतप्त सवाल माजी नगरसेवक तानाजी लोणकर, संजय लोणकर, भरत चौधरी, प्रसाद बाबर, अजित लोणकर यांनी रस्त्यावरील अजब प्रकार पाहून उपस्थित केला आहे. ठोस उत्तर द्या, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग््राामस्थांनी दिला आहे.

पुणे मनपा हद्दीत सायकल रेस बाणेरपासून येवलेवाडी या परिसरातून पुरंदर तालुक्याकडे जाणार या मार्गातील सरपेस इंटरनॅशनल सायकल रेस नॉम्सप्रमाणे ठेवणे गरजेचे असल्यामुळे व रस्त्याची स्थिती पाहून डांबर टाकण्यात आले आहे.

अविनाश कामठे, उपअभियंता, पथविभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news