Khelo India Mallakhamb Selection: खेलो इंडिया मल्लखांब निवड चाचणीत पंचांची नावे बदलल्याने वाद; क्रीडा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या सहाय्यक संचालकांच्या डिजिटल सहीने पत्र जारी; उच्चस्तरीय चौकशीची मागणी, अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण
Khelo India Mallakhamb Selection Controversy
Khelo India Mallakhamb Selection ControversyPudhari
Published on: 
Updated on: 

सुनील जगताप

पुणे: 'खेलो इंडिया युथ गेम'च्या राज्यस्तरीय मल्लखांब निवड चाचणी स्पर्धेत क्रीडा खात्याच्या बेजबाबदार कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. एका बाजूला खेळाडू घाम गाळून आपल्या भविष्याची तयारी करत असताना, दुसरीकडे क्रीडा विभागातील अधिकारी मात्र एसी केबिन असो वा हॉस्पिटलचा बेड, मनमानी कारभार चालवण्यात मग्न असल्याचे समोर आले आहे.

Khelo India Mallakhamb Selection Controversy
Pune Timber Market Fire: टिंबर मार्केटच्या आगीत संसारासह स्वप्नेही राख; व्यापारी, रहिवाशांचा आक्रोश

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहाय्यक संचालक डॉ. चंद्रशेखर साखरे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्‍णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी त्‍यांच्या सहीचे शासकीय पत्रक काढून पंचांची नावे बदलल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. हा प्रकार केवळ नियमबाह्य नसून सरळ सरळ खेळाडूंच्या भवितव्याशी केलेला खेळ आहे.

Khelo India Mallakhamb Selection Controversy
Pune Timber Market Fire: टिंबर मार्केटच्या आगीची १६ वर्षीय श्लोकच्या प्रसंगावधानामुळे अग्निशमन दलाला वेळीच माहिती

या निवड चाचणी प्रक्रियेत ऐनवेळी पंचांची नावे बदलल्याने स्पर्धेत मोठा गोंधळ उडाला. नियमांनुसार अशा स्पर्धांमध्ये पारदर्शकता आणि निष्पक्षता असणे अत्यंत गरजेचे असते. मात्र, प्रत्यक्ष हॉस्पिटलच्या बेडवर उपचार घेत असलेल्या अधिकाऱ्याने तिथूनच शासकीय सहीचा वापर करून पंचांची नावे बदलणे, हा क्रीडा क्षेत्रातील अंधाधुंदीचा कळस आहे. जर संबंधित अधिकारी खरोखरच रुग्णालयात आजारी होते, तर मग शासकीय दस्तऐवजांवर स्वाक्षऱ्या करून निर्णय घेण्याची त्यांची इतकी घाई का होती? यामागे नेमका कोणता काळाबाजार किंवा कोणाचा वशिला चालवण्याचा घाट होता, असा संतप्त सवाल आता खेळाडू आणि क्रीडाप्रेमींमधून विचारला जात आहे.

Khelo India Mallakhamb Selection Controversy
Pune Timber Market Fire: टिंबर मार्केटमधील अतिक्रमणांमुळे अग्निशमन दलाला अडथळा; ठेकेदारावर कारवाईची मागणी

उच्चस्तरीय चौकशी करावी

शासनाने आणि क्रीडामंत्र्यांनी या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेतली पाहिजे. हॉस्पिटलच्या बेडवरून शासकीय कागदपत्रांचे खेळ खेळणाऱ्या व खेळाडूंचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या या अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करून उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी काही खेळाडू आणि प्रशिक्षकांनी केली आहे.

Khelo India Mallakhamb Selection Controversy
Pune Timber Market Fire: पुण्यात टिंबर मार्केटला भीषण आग; ४५ दुकाने, सहा घरे जळून खाक

तब्येत बरी नसल्याने दि. १६ नोव्हेंबर रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतो. पंचाबाबत काढलेल्या शासकीय पत्रावर माझीच डिजिटल सही आहे. मात्र, त्यातून उडालेल्या गोंधळामुळे तब्येत बरी नसताना ही कामावर हजर झालो आहे. ज्या संघटनेने अधिकृत कागदपत्रे दिली, त्यांच्याच संघटनेचे खेळाडू खेळवले आहेत.

डॉ. चंद्रशेखर साखरे, सहाय्यक संचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.