Khed RTE Admission Fraud: आरटीई प्रवेशासाठी खोटी कागदपत्रे; खेडमध्ये १४ पालकांवर गुन्हा

रहिवासी पुराव्यांबाबत शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप; दोन शाळांतील प्रवेशासाठी सादर केली होती कागदपत्रे
RTE admission
RTE Admission Pudhari
Published on: 
Updated on: 

राजगुरुनगर: आरटीई (शिक्षणाचा हक्क) २५ टक्के कोट्यातून मुलांना शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी रहिवासी पुराव्याबाबत खोटी कागदपत्रे सादर करून शासनाची दिशाभूल आणि फसवणूक केल्याच्या आरोपाखाली १४ पालकांविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RTE admission
Someshwar Election: सोमेश्वर कारखाना निवडणुकीला धक्कादायक वळण; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फूट, विद्यमान अध्यक्ष भाजपच्या गळाला

या प्रकरणी दै. पुढारीने अनेकदा सडेतोड वृत्त प्रसिद्ध केले होते. याशिवाय जिल्हा परिषदेचे गटनेते ॲड विजयसिंह शिंदे पाटील यांनी हे प्रकरण जिल्हा परिषदेच्या सभागृहात मांडले. त्यामुळे वरिष्ठांनी आदेश दिला आणि त्यानुसार तालुका गट शिक्षण अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. दै. पुढारीच्या वारंवारच्या वृत्तामुळे हे प्रकरण समोर आले असून प्रकरण पालकांवर शेकवले असले तरी अनेक पालकांना गरज असताना आर्थिक तडजोड करून ही प्रक्रिया पार पडल्याचे यामुळे निश्चित झाले आहे.

RTE admission
Maharashtra Drought: महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट; ३५ जिल्ह्यांत पावसाची तूट, १९ जिल्हे ‘रेड झोन’मध्ये

गटशिक्षणाधिकारी (पंचायत समिती खेड) अमोल विजय जंगले यांनी केलेल्या तक्रारीनुसार, मार्च २०२६ ते मे २०२६ दरम्यान आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ अंतर्गत इयत्ता पहिलीसाठी प्रवेश मिळवण्यासाठी पालकांनी तालुका स्तरीय समिती (पंचायत समिती खेड) येथे कागदपत्रे सादर केली. मात्र, त्यांनी सादर केलेल्या रहिवासी पुराव्याच्या पत्त्यांवर ते प्रत्यक्षात राहत नव्हते. यामुळे शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

RTE admission
MLA MP Fund Development Works: आमदार-खासदार निधीतील कामांची माहिती ऑनलाइन का नाही? प्रशासनावर सजग नागरिक मंचाचा आरोप

या प्रक्रियेद्वारे १० पालकांनी डॉ. विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस स्कूल, आळंदी देवाची येथे तर ४ पालकांनी पोदार इंटरनॅशनल स्कूल, आंबेठाण येथे प्रवेश घेण्यासाठी अर्ज केल्याचे नमूद आहे. आरोपी पालकांमध्ये गणेश अरूण साळुंखे, सतिश दत्तात्रय गुंड, उत्तरेश्वर आश्रुबा गोचडे, योगेश बबन सातपुते, समिर रामचंद्र गोरे, राहुल भगवान चौधरी, वैभव होणाजी मोहीते, अजय मच्छिंद्रनाथ विरकर, संदीप दादा शिंदे, रमाकांत आनंदराव चव्हाण तसेच दयानंद फकीरप्पा कुंभार, संदीप भिमराव कांदेकर पाटील, निलेश देवराव शेकार आणि अंगद दिलीप राउत यांचा समावेश आहे.

RTE admission
AI Translation Accuracy: एआय भाषांतराचा वेग अफाट; मात्र अचूकतेची हमी नाही!

गुन्हा भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८(४), ३३६(३) आणि ३(५) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९.३८ वाजता नोंदवण्यात आला. प्रकरणाची चौकशी सहाय्यक पोलिस निरीक्षक राऊळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे तर प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महेश विधाते अधिक तपास करीत आहेत. आरटीई कोट्यातून प्रवेश मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करण्याच्या प्रकरणांमध्ये पोलीस कठोर कारवाई करत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मोठ्या आर्थिक तडजोडी करून अधिकाऱ्यांनीच या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे गटनेते ॲड विजयसिंह शिंदे पाटील यांनी पुन्हा एकदा केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news