AI Translation Accuracy: एआय भाषांतराचा वेग अफाट; मात्र अचूकतेची हमी नाही!

शब्दांचे चुकीचे अर्थ, सांस्कृतिक संदर्भातील त्रुटींची शक्यता; तज्ज्ञांकडून पडताळणी आवश्यक
AI Translation Accuracy
AI Translation AccuracyPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: अमित यांनी पुस्तकासाठीचा मजकूर मराठीतून इंग्रजीत भाषांतरित करण्यासाठी एआय ॲपचा वापर केला. अवघ्या एका सेकंदात मजकूर भाषांतरित झाला. मात्र, त्यातील शब्दांचे अर्थ तपासताना काही शब्दांचा अर्थ चुकीचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अखेर त्यांनी तो मजकूर भाषातंरकाराकडून भाषांतरित करून घेतला. सध्या भाषांतराच्या क्षेत्रातही काळानुसार बदल होत असून, प्रकाशन क्षेत्र असो वा जाहिरात क्षेत्र... सगळीकडे भाषांतरासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, एआयचा वापर करताना त्याद्वारे भाषांतरित होणाऱ्या मजकुराकडे डोळस आणि सजगपणे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

AI Translation Accuracy
Pune Waterlogging: पुण्यात तासाभराच्या पावसाने महापालिकेच्या दाव्यांची पोलखोल; अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

सध्या चॅटजीपीटीसह विविध एआय ॲप्सच्या माध्यमातून एका भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेत सहज भाषांतरित करता येतो. विद्यार्थी, लेखक, नोकरदार आणि भाषांतरकारांकडूनही या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. प्रकाशन, जाहिरात, कॉर्पोरेट, कला-सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात एआयच्या माध्यमातून भाषांतर करण्याचे प्रमाण वाढले आहे. आताच्या घडीला भाषांतर करणाऱ्या एआय ॲपची संख्या वाढली आहे. युवा पिढीकडून भाषांतरासाठी एआय ॲप्सचा वापर केला जात आहे. योग्य सूचना दिल्यानंतर उदा. इंग्रजीतील मजकूर काही सेकंदांत मराठीत किंवा अन्य भाषेत भाषांतरित होतो. त्यामुळे वेळ आणि श्रमांची बचत होत असली, तरी भाषांतरातील अचूकता आणि मूळ आशय जपण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

AI Translation Accuracy
Sinhgad Road Wrong Side Driving: सिंहगड रस्त्यावर ‘रॉंग साईड’चा धुमाकूळ; धायरी ते नांदेड सिटी मार्ग अपघातप्रवण

या पार्श्वभूमीवर जागतिक भाषांतर दिनानिमित्त आज बुधवारी (दि. ३० सप्टेंबर) भाषांतर क्षेत्रातील तज्ज्ञ, प्रकाशक आणि एआयतज्ज्ञांशी संवाद साधला असता एआयमुळे भाषांतराची प्रक्रिया वेगवान आणि सुलभ झाली असली, तरी त्यातून मिळणारा मजकूर अचूक असेलच, याची खात्री देता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एआयने केलेल्या भाषांतरात शब्दांचे चुकीचे अर्थ, संदर्भातील त्रुटी आणि सांस्कृतिक आशयाचा अभाव आढळत असल्याने त्याची पडताळणी करणे आवश्यक बनले आहे. एआयद्वारे होणाऱ्या भाषांतराचा मजकूर भाषांतरकारांकडून तपासून घ्यावा, असे तज्ज्ञांनी सांगितले.

AI Translation Accuracy
Vanpuri Land Fraud: वनपुरीतील १ कोटी ७९ लाखांच्या जमीन व्यवहारात बनावट ओळखपत्रांचा आरोप

माहिती तंत्रज्ञान, एआय तज्ज्ञ आणि लेखक डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, भाषांतर म्हणजे केवळ शब्दांची अदलाबदल नसून, विचार, संस्कृती आणि भावना जोडणारा सेतू आहे. एआयमुळे स्वयंचलित भाषांतर आणि बहुभाषिक संवाद शक्य झाला असून, भारतासारख्या बहुभाषिक देशात ज्ञान मातृभाषेत पोहोचविण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. मात्र, एआयचे भाषांतर शंभर टक्के अचूक असेलच असे नाही. म्हणी, वाक्प्रचार, उपरोध आणि सांस्कृतिक संदर्भांचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो. त्यामुळे विशेषतः वैद्यकीय, कायदेशीर आणि तांत्रिक मजकुराची तज्ज्ञांकडून पडताळणी आवश्यक आहे. एआयचा वेग आणि मानवी भाषिक समज यांची सांगड घालणे महत्त्वाचे आहे.

AI Translation Accuracy
Malegaon Sugar Factory: माळेगाव साखर कारखाना देशातील आदर्श कारखाना बनवण्याचे स्वप्न; सुनेत्रा पवारांचा निर्धार

चपराक प्रकाशनचे संचालक घनश्याम पाटील म्हणाले, प्रकाशन क्षेत्रात एआयचा वापर प्रामुख्याने तातडीने भाषांतर करण्यासाठी केला जातो. मात्र, अनेकदा त्यातून चुकीचे संदर्भ आणि माहिती समोर येते. त्यामुळे एआयने केलेल्या भाषांतराची पुन्हा पडताळणी करावी लागते. विशेषतः साहित्याच्या भाषांतरात लेखकाचा मूळ भाव, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक संदर्भ जपणे महत्त्वाचे आहे.

एआयद्वारे भाषांतर करताना घ्या काळजी!

  • एआयने केलेले भाषांतर पडताळणी केल्याशिवाय प्रकाशित करू नका.

  • मूळ मजकुरातील महत्त्वाचे शब्द, संदर्भ किंवा माहिती वगळले जाणार नाही, याची खात्री करावी.

  • वैद्यकीय, कायदेशीर आणि तांत्रिक मजकुराची तज्ज्ञांकडून पडताळणी करून घ्या.

  • गोपनीय माहिती एआय ॲपमध्ये टाकताना तिच्या सुरक्षिततेची काळजी घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news