Kharadi Vehicle Vandalism: खराडीत वाहनांची तोडफोड; चौघांना अटक, एका अल्पवयीनाला ताब्यात

मुलीसोबत झालेल्या वादाच्या रागातून लोखंडी हत्यारे आणि दांडक्यांनी वाहनांची तोडफोड; खराडी पोलिसांची तातडीची कारवाई
Arrested
ArrestedPudhari
Published on
Updated on

पुणे: मुलीसोबत झालेल्या वादाचा राग आल्यामुळे आरोपीने साथीदारांना बोलावून घेत लोखंडी हत्यारासह दांडक्याने परिसरातील वाहनांची तोडफोड केली आहे. ही घटना २६ जूनला रात्री साडेआठच्या सुमारास खराडीतील थिटे वस्तीवरील माताजी मार्केटजवळ घडली आहे.

Arrested
ITI Admission Merit List Delay: राज्यात आयटीआय प्रवेश प्रक्रियेत विलंब; विद्यार्थ्यांची प्रतीक्षा वाढली

याप्रकरणी चौघांना खराडी पोलिसांनी अटक केली असून, एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे. रोहित उर्फ रमेश संजय गवळी (वय २३, रा. केशवनगर, मुंढवा), समर्थ बसवराज केंगारे (वय १८, रा. केशवनगर, मुंढवा), किरण संजय गवळी (वय २१, केशवनगर, मुंढवा), विनोद श्रावण गवळी ( वय २०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी खराडीतील एकाने फिर्याद दाखल केली आहे.

Arrested
Ketan Agarwal Murder Case: केतन अगरवाल खून प्रकरणात लोहगडावर ‘क्राईम रिक्रिएशन’; तपासाला निर्णायक वळण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मुलीसोबत एका आरोपीचा वाद झाला होता. त्याच रागातून त्याने २६ जूनला रात्री साडेआठच्या सुमारास आरोपींना एकत्र बोलावले. हातातील शस्त्र आणि दांडक्यांनी त्यांनी परिसरातीली वाहनांची तोडफोड केली. परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच, खराडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजनुसार पसार आरोपींचा शोध घेऊन चौघांना अटक केले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सावन आवारे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news