Kharadi Spa Raid: खराडीत स्पाच्या आडून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; मॅनेजर ताब्यात, महिलेची सुटका

बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी केली खात्री; ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त, जागा देणाऱ्या महिलेलाही आरोपी
Prostitution Racket Crime Case
Prostitution Racket Crime CasePudhari
Published on
Updated on

पुणे: खराडी परिसरातील स्पाच्या आडून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून ‘फील टच स्पा’मध्ये सुरू असलेल्या प्रकाराची खात्री केल्यानंतर छापा टाकला. या कारवाईत स्पाची मॅनेजर राधिका हरिप्रसाद शर्मा (वय ३८) हिला ताब्यात घेण्यात आले. तसेच, नागालँड येथील २६ वर्षीय महिलेची सुटका करून तिला सुरक्षितस्थळी पाठवण्यात आले. या प्रकरणात स्पासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या मनीषा विद्यानंद शिंदे (वय ५४) हिलाही आरोपी करण्यात आले आहे.

Prostitution Racket Crime Case
Pune Ganeshotsav Metro: गणेशोत्सवात पुणेकरांना गर्दीपासून दिलासा; मेट्रोच्या फेऱ्या वाढणार

खराडी परिसरातील सिटी व्हिस्टा इमारतीच्या विंग-एमधील पहिल्या मजल्यावर स्पामध्ये मसाजच्या नावाखाली अनैतिक प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला ‘फील टच स्पा’मध्ये पाठवून खात्री केली व सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी स्पावर छापा टाकला. चौकशीदरम्यान राधिका शर्माने आपण स्पाची मॅनेजर व संचालक असल्याचे सांगितले. पोलिसांनी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी तिला ताब्यात घेतले.

Prostitution Racket Crime Case
Pune Ganeshotsav Decoration: गणरायाच्या सजावटीला झगमगाटाची किनार; पुणेकरांकडून भारतीय बनावटीच्या विद्युत माळांना पसंती

पोलिसांच्या तपासात स्पामध्ये काम करणारी २६ वर्षीय महिला नागालँड येथील असल्याचे समोर आले. ती दोन वर्षांपासून या स्पामध्ये काम करत होती. कारवाईदरम्यान पोलिसांनी बनावट ग्राहकाला देण्यात आलेले चार हजार रुपये तसेच काउंटरवरील १८ हजार ५०० रुपये रोख जप्त केले. याशिवाय दोन मोबाईल फोन, पेटीएम यूपीआय मशीन, सीसीटीव्ही डीव्हीआर, रेटकार्ड आणि अन्य साहित्य असा एकूण ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Prostitution Racket Crime Case
Pune Ganeshotsav Sound System Rules: गणेश विसर्जन मिरवणुकीतील साउंड सिस्टिमचा वाद कायमचा मिटवा; वसंत मोरेंची सरकारकडे मागणी

तपासात स्पाच्या जागेबाबत फेब्रुवारी २०२६ मध्ये भाडेकरार केल्याचे समोर आले. पोलिसांच्या माहितीनुसार, मनीषा शिंदेने स्पासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. राधिका शर्मासोबत संगनमत करून येथे अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दोघींविरुद्ध खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news