Maharashtra Temple Fee Pre Wedding Shoot: खामुंडीतील काळभैरवनाथ मंदिरात प्री-वेडिंग शूटला शुल्क

पावित्र्य राखण्यासाठी ट्रस्टचा निर्णय; नियमभंग केल्यास कारवाईचा इशारा
Temple Fee Pre Wedding Shoot
Temple Fee Pre Wedding ShootPudhari
Published on
Updated on

ओतूर: खामुंडी (ता. जुन्नर) येथील प्रसिद्ध व अत्यंत विलोभनीय आणि निसर्गरम्य परिसराने नटलेल्या श्री काळभैरवनाथ मंदिर परिसरात प्री-वेडिंग चित्रीकरणासाठी आता दोन हजार रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. मंदिराचे पावित्र्य आणि शिस्त अबाधित ठेवण्यासाठी देवस्थान ट्रस्टने हा कडक निर्णय घेतल्याची माहिती आहे.

Temple Fee Pre Wedding Shoot
Nasrapur Traffic Jam: नसरापूरमध्ये अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी

श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त व पदाधिकाऱ्यांच्या मासिक बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मंदिर परिसरात वाढत्या प्री-वेडिंग शूटिंगमुळे धार्मिक वातावरणाला बाधा येत असल्याची बाब लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Temple Fee Pre Wedding Shoot
HYROX Fitness Competition India: पुण्याच्या साक्षी छाजेडची HYROX स्पर्धेत झेप

मंदिराची भव्य व आकर्षक कलाकुसरीने नटलेली वास्तुरचना, निसर्गरम्य परिसर आणि शांत वातावरण यामुळे येथे प्री-वेडिंग शूटसाठी गर्दी होते. मात्र, काही ठिकाणी चित्रीकरणादरम्यान शिस्तभंग आणि पावित्र्याला धक्का बसत असल्याच्या तक्रारी भाविकांमधून पुढे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर देवस्थान ट्रस्टने आता स्पष्ट नियमावली लागू केली आहे.

Temple Fee Pre Wedding Shoot
Baby Corn Export Crisis: आखाती तणावाचा फटका; बेबी कॉर्न निर्यात घटली

यापुढे येथे प्री-वेडिंग चित्रीकरणासाठी 2 हजार रुपये शुल्क अनिवार्य केले आहे. त्याबाबत देवस्थानकडून अधिकृत पावती घेणे बंधनकारक असणार आहे. पावती नसल्यास चित्रीकरणास सक्त मनाई असल्याची माहिती ट्रस्ट प्रशासनाने दिली आहे.

Temple Fee Pre Wedding Shoot
Maharashtra Beggar Free Scheme: भीक व भूकमुक्त महाराष्ट्रासाठी अन्न आयोगाच्या 8 शिफारशी

याबाबत मंदिराच्या पावित्र्याचा मान राखत नियमांचे काटेकोर पालन करावे. अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा देवस्थान ट्रस्टकडून देण्यात आला आहे. परवानगीशिवाय शूटिंग करताना आढळल्यास त्वरित थांबविण्यात येणार असून, संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक असल्यास पोलिस प्रशासनाची मदत घेण्यात येणार आहे. देवस्थान ट्रस्टच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे.

मंदिर हे केवळ पर्यटनस्थळ नसून, भाविक भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. त्याचे पावित्र्य जपणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळेच हा कडक निर्णय घेण्यात आला आहे.

संदीप गंभीर, अध्यक्ष देवस्थान ट्रस्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news