Khadakwasla Hindu Muslim Unity: खडकवासल्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श; भैरवनाथ देवस्थानला मस्जिद ट्रस्टकडून चार गुंठे जमीन भेट

सांस्कृतिक भवनासाठी बिलाल मस्जिद ट्रस्टचे सहकार्य; भूमिपूजन सोहळ्यात सामाजिक सलोख्याचा संदेश
Khadakwasla Hindu Muslim Unity
Khadakwasla Hindu Muslim UnityPudhari
Published on: 
Updated on: 

दत्तात्रय नलावडे

खडकवासला: हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविणारा अनोखा उपक्रम खडकवासला येथे घडला आहे. येथील शिवकालीन श्री भैरवनाथ देवस्थानच्या सांस्कृतिक भवनासाठी बिलाल मस्जिद ट्रस्टने मध्यवर्ती ठिकाणी असलेली चार गुंठे जमीन बक्षीस दिली आहे. या जागेवर उभारण्यात येणाऱ्या बहुपयोगी सांस्कृतिक भवनाचे रविवारी (दि. १) भूमिपूजन करण्यात आले. मुस्लिम बांधवांनी देवस्थानच्या विधायक कार्यासाठी जमीन देत सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला आहे.

Khadakwasla Hindu Muslim Unity
Pune Diwali Bail Applications: दिवाळीत आपला माणूस घरी यावा; जामीन, पॅरोलसाठी न्यायालयांत धावपळ

या निर्णयामुळे खडकवासला गावातील हिंदू-मुस्लिम बांधवांमधील अनेक वर्षांचे सलोख्याचे संबंध अधिक दृढ झाले आहेत. सांस्कृतिक भवनाचा उपयोग भाविकांसह ग्रामस्थांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांसाठी होणार आहे. या वेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पराग मते, उपाध्यक्ष अशोक मते आणि विश्वस्तांनी मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष नुरमहमंद सय्यद यांच्यासह मुस्लिम बांधवांचा सन्मान केला.

Khadakwasla Hindu Muslim Unity
Pune Crime: प्रेमभंगातून तरुणाचा टोकाचा निर्णय; मित्रांना केला ‘पुढच्या जन्मी भेटू’ असा शेवटचा मेसेज

भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव दत्तात्रय कोल्हे म्हणाले की, मुस्लिम बांधवांनी मस्जिद ट्रस्टची जमीन देवस्थानच्या विधायक कार्यासाठी बक्षीस देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मानवतावादी विचारांचा जागर केला आहे. या निर्णयातून सामाजिक एकतेचा आदर्श निर्माण झाला आहे. खडकवासल्याची ओळख आता हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविणारे गाव अशी होईल.

Khadakwasla Hindu Muslim Unity
Janata Vasahat Land TDR: जनता वसाहत लॅंड टीडीआर प्रकरणाची चौकशी होणार; विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्तांची समिती

या वेळी नगरसेवक सुभाष नाणेकर, विलास मते, सुहास मते, विजय मते, विजय कोल्हे, अजय कोल्हे, अनिल मते, मुरलीधर मते, सुरेश मते, आनंद मते, संदीप मते, तन्वीर शेख, सोहेल शेख, असिफ शेख आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Khadakwasla Hindu Muslim Unity
Khed Taluka Rainfall: खेड तालुक्यात परतीच्या पावसाची दमदार हजेरी; बळीराजाला मोठा दिलासा

ही जमीन अनेक वर्षांपासून बिलाल मस्जिद ट्रस्टच्या ताब्यात आहे. जवळच भैरवनाथ देवस्थान असल्याने देवस्थानच्या विधायक कार्यासाठी मुस्लिम बांधवांनी एकजुटीने जमीन देण्याचा निर्णय घेतला. मुस्लिम बांधव देवस्थानच्या विविध सण-उत्सवांत आणि उपक्रमांतही सहभागी होतात.

नूरमहंमद सय्यद, अध्यक्ष बिलाल मस्जिद ट्रस्ट, खडकवासला

खडकवासला गावातील हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये अनेक वर्षांपासून सलोख्याचे संबंध आहेत. या निर्णयामुळे ते आणखी दृढ झाले आहेत. सांस्कृतिक भवनाचा उपयोग सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांसाठी होणार आहे. या सहकार्याबद्दल बिलाल मस्जिद ट्रस्ट आणि मुस्लिम बांधवांचे आम्ही आभारी आहोत.

पराग मते, अध्यक्ष, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, खडकवासला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.