Pune Crime: प्रेमभंगातून तरुणाचा टोकाचा निर्णय; मित्रांना केला ‘पुढच्या जन्मी भेटू’ असा शेवटचा मेसेज

खराडीतील हॉटेलमध्ये गावठी पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडली; अक्षय कांबळे याच्या मृत्यूचा पोलिसांकडून तपास
Crime News
Crime NewsPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: प्रेम करत असलेल्या तरुणीने दुसर्‍याबरोबर लग्न केल्याच्या नैराश्यातून तरुणाने मित्रांना ‘आता ही शेवटची भेट, यानंतर भेटू पुढच्या जन्मी,’ असा मेसेज करून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

Crime News
Janata Vasahat Land TDR: जनता वसाहत लॅंड टीडीआर प्रकरणाची चौकशी होणार; विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्तांची समिती

अक्षय कालिदास कांबळे (वय २६, रा. पूर्वरंग सोसायटी, पेरणे फाटा) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना खराडीमधील तुळजा भवानी नगरमधील हॉटेल गौरव रेसिडेन्सीमध्ये गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर २०२६) दुपारी २ वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक मीरा लक्ष्मण चव्हाण यांनी खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Crime News
Khed Taluka Rainfall: खेड तालुक्यात परतीच्या पावसाची दमदार हजेरी; बळीराजाला मोठा दिलासा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कांबळे हा कोरेगाव भीमा येथील एका बँकेत कंत्राटी पद्धतीने नोकरीवर होता. तो २७ ऑक्टोबर रोजी खराडीतील हॉटेल गौरव रेसिडेन्सी येथील तिसर्‍या मजल्यावरील खोलीमध्ये मुक्कामाला होता. २९ ऑक्टोबर रोजी दुपारपर्यंत त्याने खोली न उघडल्याने त्यांनी खोली उघडून पाहिले, तर अक्षय कांबळे याच्या हातात गावठी पिस्तूल होते व तो खाली पडलेला होता.

Crime News
Pune Unseasonal Rainfall: पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; मगरपट्ट्यात सर्वाधिक १८ मिमी पावसाची नोंद

हॉटेलचे कर्मचारी जितेंद्र पाडी यांनी खराडी पोलिस ठाण्यात ही माहिती दिली होती. पोलिस हॉटेलमध्ये पोहोचले. अक्षय कांबळे याने दोन्ही हाताने पिस्तूल पकडलेले व उजव्या हाताचा अंगठा पिस्तुलाच्या एक्स्ट्रॅक्टरवर अडकलेला दिसून आला. त्याचे वडील व भाऊ विशाल कालिदास कांबळे यांनी अक्षय कांबळे याला ओळखले. त्याला सरळकरून पाहिले असता त्याच्‍या कपाळावर मधोमध गोळी मारून घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.

Crime News
Baramati Heavy Rainfall: बारामतीत तीन महिन्यांनंतर पावसाची जोरदार हजेरी; रस्ते जलमय

अक्षय कांबळे याचा विवाह होत नव्हता, तसेच त्याचे प्रेम असलेल्या तरुणीने दुसर्‍याबरोबर विवाह केल्याची माहिती आहे. त्या निराशेतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मित्रांना शेवटचा मेसेज केला होता. त्यात त्याने ‘आपली ही शेवटची भेट, त्यानंतर पुढच्या जन्मी आता भेटू,’ असे लिहिले होते. अक्षय कांबळे याच्याकडे हे गावठी पिस्तूल कोठून आले. त्याच्या आत्महत्यामागील नेमके कारण काय, याचा सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.