Khadakwasla Dam Water Storage: खडकवासला धरणसाखळीत पाण्याची आवक थांबली; गतवर्षीच्या तुलनेत सव्वा टीएमसी तूट

साखळीत २७.८५ टीएमसी म्हणजेच ९५.५५ टक्के पाणीसाठा; उन्हाळ्यातील पाणीपुरवठ्यासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा
Khadakwasla Dam
Khadakwasla DamPudhari
Published on: 
Updated on: 

खडकवासला: पावसाने उघडीप दिल्याने खडकवासला धरणसाखळीतील पाण्याची आवक जवळपास बंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत धरणसाखळीत जवळपास सव्वा टीएमसी पाणी कमी आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पिण्यासाठी व शेतीसाठी पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होण्यासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

Khadakwasla Dam
Pune Noise Pollution: ध्वनिप्रदूषणाला धर्मस्वातंत्र्याची ढाल नको; नागरिकांनी कायदेशीर लढा द्यावा: विद्यानंद बापट

रविवारी (दि. २७) सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत २७.८५ टीएमसी म्हणजेच ९५.५५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या वर्षी २७ सप्टेंबर रोजी धरणसाखळीत २९.०६ टीएमसी म्हणजे ९९.६९ टक्के पाणी होते. शहर व जिल्ह्यातील जवळपास एक कोटी नागरिक आणि ६६ हजार हजार हेक्टर शेती पाण्यासाठी धरणसाखळीवर अवलंबून आहे.

Khadakwasla Dam
Pune Crime: विश्रांतवाडीत १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; ५२ वर्षीय आरोपीला अटक

गेल्या आठ दिवसांपासून पानशेतसह खडकवासला भागात पावसाने उघडीप दिली. सकाळी दाट धुके आणि नंतर कडकडीत उन्हं पडत आहे. त्यामुळे धरणसाठ्यातील पाण्याची आवक बंद झाली आहे. सध्या खडकवासला धरणातून मुठा कालवा आणि बंदिस्त जलवाहिन्यांतून १ हजार ७८५ क्युसेक पाणी सोडले जात आहे. त्यामुळे धरणसाठ्यात घट सुरू आहे. खडकवासला धरणपातळी १.०० टीएमसी म्हणजे ५०.६३ टक्क्यांवर पोहचली आहे. तसेच सध्या खडकवासला धरणात वरसगाव व पानशेत धरणांच्या वीजनिर्मिती प्रकल्पाच्या सांडव्यातून प्रत्येकी ६०० क्युसेक पाणी सोडले जात आहे.

Khadakwasla Dam
Pune Vegetable Market Rates: पितृपक्षामुळे भाज्यांना मागणी; गुलटेकडी बाजारात भाज्यांचे भाव १५ टक्क्यांपर्यंत वाढले

खडकवासला धरणाचे शाखा अभियंता विरेश राऊत म्हणाले, 'सध्या धरणसाखळीत मुबलक पाणी असले, तरी येत्या ऑक्टोबरपर्यंत धरणसाखळीत शंभर टक्के पाणीसाठा शिल्लक असल्यास आगामी काळात पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करतो येतो. खडकवासला वगळता इतर तिन्ही जवळपास धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे एक-दोन जोरदार पाऊस पडल्यास पाण्याची तूट भरून निघेल.

Khadakwasla Dam
Pune Fruit Market Rates: लिंबाची आवक वाढली, पण मागणी घटली; गोणीमागे ४०० रुपयांपर्यंत भाव घसरले

धरणसाखळीत सध्याचा साठा

  • धरण क्षमता (टीएमसी) : आजचा साठा (टीएमसी) : टक्केवारी

  • खडकवासला : १.९७ : १ .०० : ५०.६३

  • पानशेत : १०.६५ : १०.४१ : ९७.७९

  • वरसगाव : १२.८२ : १२.७३ : ९९.३२

  • टेमघर : ३.७१ : ३.७१ : १००

  • एकूण : २९.१५ : २७.८५ : ९५.५५

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news