Khadakwasla Dam water release
खडकवासला: पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या धरणक्षेत्रांत रविवारी (दि. 27) पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणसाखळीत मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ झाली. परिणामी, खडकवासला धरणातून सायंकाळी 6 वाजता मुठा नदीपात्रात 18,483 क्युसेक विसर्ग करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
खडकवासला धरणसाखळीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 91.03 टक्के म्हणजे 26.54 टीएमसी पाणीसाठा झाला होता. यामुळे विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ केली जात आहे. पानशेत धरणाच्या वीज सांडव्यातून 600 क्युसेक, वांजळवाडी सांडव्यातून 3008 तसेच वरसगावच्या वीज सांडव्यातून 600 आणि मुख्य सांडव्यातून 8474 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. पानशेतमधून एकूण 3608 क्युसेक आणि वरसगावमधून 9074 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. (Latest Pune News)
टेमघर येथे रविवारी दिवसभरात 20 मिलिमीटर, वरसगाव व पानशेत येथे प्रत्येकी 9, तर खडकवासला येथे 3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सायंकाळी सहानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला होता. मोसे आणि आंबी नद्या दुथडी भरून वाहत असून, डोंगराळ पट्टा व घाटमाथ्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी नद्यांमध्ये येत आहे.
गेल्या वर्षी 24 जुलैला याच भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा तसे होऊ नये म्हणून धरणांवरील पाणीपातळी 70 टक्क्यांपर्यंत राखण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. अधिकारी आणि कर्मचारी 24 तास पहारा देत आहेत.
खडकवासला धरणसाखळी
एकूण पाणी साठवणक्षमता 29.15 टीएमसी
रविवारचा पाणीसाठा
26.54 टीएमसी (91.03 टक्क