Khadakwasla corporator Komal Navle: खडकवासला प्रभाग 34 ‘ब’ गटातील नगरसेविका कोमल नवले यांचा विकासाचा संकल्प

पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि महिला सुरक्षेला प्राधान्य; नऱ्हे-धायरी भागासाठी ॲक्शन प्लॅन जाहीर
Khadakwasla corporator Komal Navle
Khadakwasla corporator Komal NavlePudhari
Published on
Updated on

खडकवासला: ‌‘प्रभाग 34च्या ब गटामधून मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला भरघोस मतांनी देत नगरसेवक म्हणून महापालिकेत पाठवले आहे. त्यांच्या विश्वासाला जागत लोकहिताची कामे करून प्रभागाचा कायापालट करण्याचा माझा संकल्प आहे. समाविष्ट गावांतील कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि महिला सुरक्षा या प्रश्नांना माझे प्रथम प्राधान्य असेल,‌’ असे प्रतिपादन नगरसेविका कोमल नवले यांनी केले.

Khadakwasla corporator Komal Navle
Pune Airport Hydroponic Weed Seizure: पुणे विमानतळावर खेळण्यांच्या बॉक्समध्ये लपवलेला साडेपाच कोटींचा गांजा जप्त

नऱ्हे- वडगाव बुद्रुक- धायरी या प्रभागाच्या नवनिर्वाचित नगरसेविका कोमल नवले यांनी शुक्रवारी (दि. 13) दै. ‌’पुढारी‌’च्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी प्रभागातील समस्या, करावयाच्या उपाययोजना यांसह विविध बाबींवर संवाद साधला. कोमल नवले यांना माहेर आणि सासर अशा दोन्ही बाजूंनी राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे. वाल्हेकरवाडी पिंपरी-चिंचवड हे त्यांचे माहेर असून, वडील बाळासाहेब वाल्हेकर हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत, तर सासरे बाळासाहेब नवले यांनी वडगाव खुर्दचे सरपंच आणि पुणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून काम केले आहे.

Khadakwasla corporator Komal Navle
Pune Budhwar Peth Minor Girls Rescue: बुधवार पेठेत पोलिसांचा छापा; गुप्त खोलीत कुलूपबंद चार अल्पवयीन मुली आढळल्या

पती सारंग नवले हेदेखील गेल्या 10 वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय असून, त्यांनी खडकवासला विधानसभा युवा मोर्चाचे अध्यक्षपद भूषवले आहे. कोमल नवले स्वतः बी.एस्सी. (केमिस्ट्री) पदवीधर असून, सुशिक्षित लोकप्रतिनिधी आहेत. कोमल नवले यांनी ‌‘ब‌’ गटातून 15,686 मताधिक्य मिळवत महापालिका निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग््रेासच्या नेहा मोरे, शिवसेनेच्या राधिका गिरमे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या सुरेखा दमिष्टे यांचा पराभव केला.

Khadakwasla corporator Komal Navle
Pune Consumer Commission iPhone Insurance: आयफोनच्या विमा दाव्यावर फेटाळणी; पुणे ग्राहक आयोगाचा विमा कंपनीला दणका

प्रभागाच्या विकासाचा ‌‘ॲक्शन प्लॅन‌’

  • नऱ्हे आणि धायरी भागात मुबलक पाणी पोहोचवण्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकण्याचे नियोजन.

  • पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती टाळण्यासाठी ग््राामपंचायत काळातील जुन्या, कमी व्यासाच्या पावसाळी वाहिन्या बदलून नव्या मोठ्या व्यासाच्या वाहिन्या टाकणार.

  • सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रांत महापालिकेकडून कचरा संकलन सुरू करणार. जेणेकरून नागरिक रस्त्यावर कचरा फेकणार नाहीत आणि परिसर स्वच्छ राहील.

  • प्रभागात सीसीटीव्हीचे जाळे विणणे आणि रात्रीची पोलीस गस्त वाढवण्यावर भर.

  • आधुनिक पथदिवे, ड्रेनेजलाईन आणि ज्येष्ठ नागरिक व बालकांसाठी सुसज्ज उद्याने विकसित करणार.

  • समाविष्ट गावांत महापालिकेचे सुसज्ज रुग्णालय व दर्जेदार शिक्षणाच्या शाळा उभ्या करण्यासाठी प्रयत्न करणार.

Khadakwasla corporator Komal Navle
Baramati Politics: अजित पवारांनंतर बारामतीचे राजकारण कोणत्या दिशेने?

आमच्या कुटुंबाच्या सामाजिक आणि राजकीय कामाची दखल घेऊन पक्षाने मला संधी दिली. या संधीचे सोने करून सर्वसामान्य मध्यवर्गीय नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर मी लक्ष केंद्रित करणार आहे.

कोमल नवले, नगरसेविका, भाजप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news