Khadakwasla Ambi Wildlife Deer Movement: खडकवासला-पानशेत परिसरात वन्यजीवांचा मुक्त संचार; हरिणांचे शेतात दर्शन वाढले

खडकवासला-पानशेत परिसरात वन्यजीवांचा मुक्त संचार; हरिण, भेकरांचे दर्शन वाढले
Deer
DeerPudhari
Published on
Updated on

खडकवासला: पानशेत-आंबी परिसरात हरीण, भेकर, ससे, मोर, लांडोर आदी वन्यप्राण्यांचा मुक्त संचार वाढला आहे. तीव उन्हामुळे जंगलात पाण्याचे तसेच खाद्याचे दुर्भीक्ष निर्माण झाले आहे. त्यामुळे शेजारच्या रानात, शेतात वन्यजीव खाद्य-पाण्यासाठी नियमितपणे संचार करताना दिसत आहेत.

Deer
Pune Mutha Canal Overflow Risk: फुरसुंगीत उजवा मुठा कालवा ओव्हरफ्लो; भिंतींना तडे, फुटीचा धोका

पानशेतजवळील आंबी (ता. हवेली)मध्ये सरकारी वनक्षेत्र नाही. मात्र, आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र, जंगल, झुडपे आहेत. त्यामुळे आंबी येथील वरपेवाडी, कळकाईदरा, रुळे (ता. राजगड) येथील भोपळटोंग, सोनापूर आदी ठिकाणी वन्यप्राण्यांचा मुक्त संचार वाढल्याचे दिसून येत आहे.

Deer
Katraj Ghat Wall Collapse Negligence: कात्रज घाटात संरक्षक भिंती ढासळल्या; नागरिकांचा जीव धोक्यात

गेल्या चार-पाच वर्षांपासून उन्हाळ्यात आंबीमध्ये हरीण, काळवीट असे प्राणी खाद्य- पाण्यासाठी येत आहेत. गाई-वासरे अशा जनावरांबरोबर ते हिरवा चारा खाताना दिसत आहेत. तेथे पाणी पिऊन रात्रभर मुक्काम करून सकाळी लवकर पुन्हा जंगलात जात आहेत. सध्या आंबीमध्ये चितळ जातीच्या हरिणांची नर व मादी अशी जोडी फिरत आहे.

Deer
Pune SRA Scam PWD Land: पुण्यात एसआरए घोटाळा; पीडब्लूडी जागेवर बनावट झोपडपट्टी दाखवून टीडीआर लूट

स्थानिक शेतकरी गणेश विठ्ठल निवंगुणे यांच्या गाई गुरांसमवेत हरिणाची जोडी चारा खाऊन शेजारच्या बाबुंच्या बेटात मुक्काम करत आहेत. जनावरांनाही या हरिणांच्या जोडीचा लळा लागला आहे.खडकवासला-पानशेत परिसरात वन्यजीवांचा मुक्त संचार; हरिणांचे शेतात दर्शन वाढले

Deer
Daund Police Externment Action: दौंडमधील दोन सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी तडीपार

आंबीच्या परिसरात मोठ्या जंगल वनराई आहे. त्यामुळे या ठिकाणी वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. जंगलातील वन्यप्राणी चारा-पाण्यासाठी स्थलांतर करून शेजारच्या रानात येत आहेत. हरीण, भेकर, ससे आदी वन्यजीवांचा शेतकऱ्यांना उपद्रव होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वन्यजीवांना उपद्रव करू नये.

समाधान पाटील, वन परिमंडळ अधिकारी, सिंहगड वन विभाग

मोकाट कुत्र्यांच्या झुंडी हरणावर धावून येतात. मात्र, नर हरीण कुत्र्यांचा पाठलाग करत त्यांना पिटाळून लावतात. शेतकऱ्यांना हरिणांची गोडी लागली आहे.

शंकरराव निवंगुणे, स्थानिक शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news