Chetan Agrawal Case: केतन हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट येणार...? सियाच्या भावासह आई वडील देखील पोलिस चौकशीच्या फेऱ्यात

Chetan Agrawal Case
Chetan Agrawal Casepudhari
Published on
Updated on

Chetan Agrawal Case: पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणी पोलिसांनी आपल्या तपासाची कक्षा आता वाढवली आहे. पुणे पोलिसांनी सिया आणि चेतन या दोघांची रात्री अकरा वाजेपर्यंत एकत्र चौकशी केली. त्यानंतर आता पोलीस लवकरच सियाचे आई-वडील यांचा देखील जबाब नोंदवणार आहेत. तसेच विशाल अग्रवाल यांच्या मामांची देखील या प्रकरणी चौकशी होणार आहे. पोलीस तपासात सियाचा भाऊ साहिल आणि चेतन यांचा काय संबंध आहे याबाबत देखील काही गोष्टींचा उलगडा झाला आहे.

Chetan Agrawal Case
Ketan Agarwal Murder Case: लोहगडावरील मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण; एका हुडीमुळे कसं उलगडलं केतन अग्रवालच्या मृत्यूचं गूढ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केतन अग्रवाल हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची रात्री अकरा वाजता पोलिसांनी लोहगड परिसरात आणून चौकशी केली. या चौकशीवेळी केतनला घेऊन सिया आणि चेतन कोणत्या मार्गेने लोहगडला गेले. लोहगडला नेमकं काय केलं याबाबत चौकशी केली. ही आरोपींना घटनास्थळावर नेऊन केलेली चौकशी होती.

Chetan Agrawal Case
Ketan Agarwal Murder Case: 'प्लॅन A' फसला तर सियाकडे 'प्लॅन B' तयार होता; केतन अग्रवाल प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा

पोलिसांनी आपल्या तपासाची कक्षा वाढवण्यास सुरूवात केली आहे. पोलीस लवकरच सियाच्या आई - वडिलांचा देखील जबाब घेणार आहेत. तसेच पोलीस आता विशाल अग्रवाल यांची मामांची देखील चौकशी करणार आहे. या प्रकरणात सियाचा भाऊ साहिलचा देखील महत्वाचा अँगल असून चेतन चौधरी आणि साहिल हे एकमेकांना ओळखत असल्याचं समोर आलं होत.

सियाचा भाऊ साहिल आणि चेतन चौधरी एकत्र क्रिकेट खेळायचे. एका क्रिकेट सामन्यावेळीच चेतन आणि सियाची पहिल्यांदा ओळख झाली. त्यानंतर ते दिवाळी पार्टीवेळी पुन्हा भेटले आणि तिथून त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर या दोघांमध्ये पुढे २३८ तास संवाद आणि २००४ फोनकॉल्स देखील झाल्याचं तपासात उघड झालं आहे.

Chetan Agrawal Case
Ketan Agarwal Case: सियाला पैसा नाही तर हवं होतं प्रेम...? करोडपती केतन तर दुसरीकडं किराना दुकानदार चेतन

दरम्यान, केतनच्या घरच्यांनी या प्रकरणात सियाचा भाऊ साहिलचा देखील रोल असण्याची शक्यता वर्तवली होती. त्यांनी केतनला मारण्याच्या कटात अजून काही लोकांचा समावेश असल्याचा आरोप देखील केला होता. त्यानंतर आता पोलिसांनी साहिलची देखील चौकशी सुरू केली आहे. आता या तपासातून काय महत्वाची माहिती समोर येते हे पाहणे गरजेचे आहे. तसेच येत्या २९ तारखेला सिया आणि चेतन यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news