Maharashtra Kerosene Distribution: एलपीजी टंचाईवर रॉकेल वितरण योजना कागदावरच; राज्यभर अंमलबजावणी ठप्प

सरकारच्या घोषणेनंतरही तीन महिने उलटूनही रॉकेल वितरण सुरू नाही; कमिशन व पुरवठा अडचणींमुळे योजना रखडली
Kerosene
KerosenePudhari
Published on
Updated on

पुणे: एलपीजी गॅसटंचाईच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून मोठा गाजावाजा करीत रॉकेलपुरवठ्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रत्यक्षात तीन महिने उलटूनही राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये रॉकेलवितरण सुरूच झालेले नाही. अपुरे कमिशन, वाढते डिझेल दर आणि पुरवठादारांच्या अटींमुळे ही योजना कागदावरच अडकून पडल्याचे वास्तव समोर आले आहे.

Kerosene
Nasarapur Case: नसरापूर बाल अत्याचार व खून प्रकरणी विशेष न्यायालयात जलदगती सुनावणी सुरू

राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानांमार्फत रॉकेल वितरणासाठी तब्बल 37 लाख 44 हजार लिटरचा कोटा निश्चित केला होता. त्यामध्ये पुणे जिल्ह्यासाठी 2 लाख 4 हजार लिटर रॉकेल मंजूर करण्यात आले. बारामती तालुक्याला सर्वाधिक 33 हजार लिटर, तर इंदापूरला 27 हजार लिटर रॉकेल देण्याचे नियोजन करण्यात आले होते. जिल्हा पुरवठा विभागाने तीन पुरवठादार निश्चित केले; मात्र प्रत्यक्षात एक थेंबही रॉकेल नागरिकांपर्यंत पोहचलेले नाही.

Kerosene
Fundkar Fruit Orchard Scheme: फळबाग लागवडीसाठी 165 कोटींची तरतूद; 15 हजार हेक्टरचे उद्दिष्ट

योजनेच्या अंमलबजावणीत सर्वांत मोठा अडथळा ठरला तो कमिशनचा मुद्दा. स्वस्त धान्य दुकानदारांना प्रतिलिटर केवळ एक रुपया कमिशन मिळणार असल्याने अनेक दुकानदारांनी रॉकेल उचलण्यास नकार दिला आहे. घाऊक विक्रेत्यांना सुमारे तीन रुपये कमिशन मिळत असले, तरी वाढत्या डिझेल दरामुळे तेही नाराज आहेत. कमिशन वाढवून मिळावे, अशी त्यांची मागणी असून, त्यावर निर्णय न झाल्याने पुरवठा प्रक्रियेला बेक लागला आहे.

Kerosene
RBI Cooperative Bank Rules: नागरी सहकारी बँकांसाठी आरबीआयच्या नियमांमध्ये मोठे बदल

गेल्या आठवड्यात दोन पुरवठादारांनी रॉकेल उचलण्याची तयारी दर्शविली. मात्र, दुकानदारांनी आगाऊ रक्कम भरल्याशिवाय पुरवठा करणार नाही, अशी अट घालण्यात आली. त्यामुळे किरकोळ दुकानदार आणखी मागे हटल्याचे चित्र आहे. परिणामी, पुरवठादार तयार असूनही मागणीअभावी रॉकेल वितरण सुरू होऊ शकलेले नाही.

Kerosene
Pune Chemists Bandh: ऑनलाइन औषध विक्रीविरोधात पुण्यात केमिस्टांचा देशव्यापी बंद यशस्वी

राज्यभरातही अशीच परिस्थिती असून बीड, धाराशिव, नाशिक, बुलडाणा आणि सोलापूर या काही जिल्ह्यांमध्ये केवळ प्रत्येकी एक टँकर रॉकेलची उचल झाली आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र योजना अद्याप कागदावरच अडकून पडली आहे. सरकारच्या घोषणांनंतरही नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा कधी मिळणार? हा प्रश्न आता अधिक तीव झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news