kedgaon News: केडगाव परिसरात गर्भलिंगनिदान रॅकेट सक्रिय? चर्चेला मोठे उधाण; आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

सध्या सोशल मीडियावर एका महिलेची कथित गर्भलिंग निदान चाचणी सुरू असतानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
kedgaon News
kedgaon NewsPudhari
Published on
Updated on

केडगाव: दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात बेकायदेशीर गर्भलिंगनिदान करणारे रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून परिसरात अशा प्रकारच्या अवैध गर्भलिंग चाचण्या सुरू असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात असून, संबंधित यंत्रणांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सध्या सोशल मीडियावर एका महिलेची कथित गर्भलिंग निदान चाचणी सुरू असतानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओची अधिकृत पुष्टी अद्याप प्रशासनाकडून करण्यात आलेली नसली तरी संबंधित डॉक्टर काही दिवसांपूर्वी केडगाव परिसरात वास्तव्यास असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

kedgaon News
Indapur Unseasonal Rain: अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा इंदापूरला तडाखा

स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या चर्चेनुसार, संबंधित डॉक्टरला अहिल्यानगर जिल्ह्यातील एका प्रभावशाली राजकीय नेत्याचा आश्रय असल्याचा आरोप केला जात आहे, तसेच आर्थिक आणि राजकीय पाठबळाच्या जोरावर काही अधिकाऱ्यांवर प्रभाव टाकला जात असल्याच्या चर्चाही परिसरात सुरू आहे.

केडगाव परिसरात हे प्रकार गेले काही वर्षे राजरोसपणे सुरू असून, आरोग्य विभागाला याचा काहीच थांगपत्ता नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकंदरीत या सर्व प्रकारबाबत तालुक्यातील आरोग्य यंत्रणा आणि पोलीस विभाग काय कारवाई करतात हे पाहावे लागणार आहे.

kedgaon News
Online Fertilizer Booking: मोबाईल ॲपद्वारे खत खरेदीची संधी; कृषी मंत्रालयाने तयार केलेल्या ॲपवर पुणे पथदर्शी प्रकल्प सुरू

कारावास आणि डॉक्टरचा परवाना होतो रद्द

गर्भलिंगनिदान करणे आणि त्याची जाहिरात करणे, हे भारतीय कायद्यानुसार गंभीर गुन्हा मानला जातो. केंद्र सरकारच्या पीसीपीएनडीटी कायद्यानुसार( Pre-Conception and Pre- Natal Diagnostic Techniques Act) गर्भाचे लिंग तपासणे, सांगणे अथवा त्यासाठी मदत करणे दंडनीय अपराध आहे. अशा प्रकरणांमध्ये दोषी आढळल्यास डॉक्टरांचा परवाना रद्द करण्याबरोबरच कारावास आणि दंडाचीही तरतूद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news