Pune Locकवठे-टाकळी हाजी गटातील लढती ठरणार लक्षवेधीal Body Election 2025
कवठे-टाकळी हाजी गटातील लढती ठरणार लक्षवेधीPudhari

Zilla Parishad Election Pune: कवठे-टाकळी हाजी गटातील लढती ठरणार लक्षवेधी

अध्यक्षपदाची संधी असल्याने सर्वच राजकीय पक्षाचे गटाकडे लक्ष; तिरंगी लढतीची शक्यता वाढली
Published on

आबाजी पोखरकर

पिंपरखेड : शिरूर तालुक्यात कवठे-टाकळी हाजी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित असून टाकळी हाजी पंचायत समिती गण इतर मागासवर्ग महिला तर कवठे गण खुला प्रवर्ग जागेसाठी आरक्षित आहे. गेले तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात जनसंपर्क कायम ठेवला आहे. जिल्हा परिषद गट सर्वसाधारणसाठी आरक्षित झाल्याने पक्ष कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारणसाठी आणि शिरूर पंचायत समिती सभापती पद इतर मागासवर्ग महिला आरक्षित असल्याने कवठे-टाकळी हाजी गटाला दुहेरी महत्त्व प्राप्त झाल्याने गट आणि गणाच्या लढती लक्षवेधी ठरणार आहे.(Latest Pune News)

Pune Locकवठे-टाकळी हाजी गटातील लढती ठरणार लक्षवेधीal Body Election 2025
Land Division Act: जाचक अटींमुळे जमिनीचे ५० लाख व्यवहार टांगणीला

कवठे-टाकळी जिल्हा परिषद गटावर गेले अनेक वर्षे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. माजी आमदार पोपटराव गावडे, त्यांचा मुलगा दिवंगत प्रा. सोनभाऊ गावडे, सुनिता गावडे यांनी या आधी गटाचे प्रतिनिधित्व केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्हा परिषद गटात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभाजन झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याचे दिसून येते आहे.

Pune Locकवठे-टाकळी हाजी गटातील लढती ठरणार लक्षवेधीal Body Election 2025
Health Department Action: पुणे परिमंडळातील 12 शासकीय रुग्णालयांवर आरोग्य विभागाची कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव राजेंद्र गावडे, शरदचंद्र पवार पक्षाकडून टाकळी हाजी गावचे माजी सरपंच दामू घोडे हे इच्छुक असून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे हे अपक्ष लढण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने, तसे झाल्यास या गटातील तिरंगी लढत ‌’कांटे की टक्कर‌’ ठरू शकते. राजेंद्र गावडे प्रथमच निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने जिल्हा परिषद गट ताब्यात ठेवण्यासाठी माजी आमदार पोपटराव गावडे यांचा कस लागणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

Pune Locकवठे-टाकळी हाजी गटातील लढती ठरणार लक्षवेधीal Body Election 2025
Daund NCP Split: दौंड तालुक्यात तिरंगी लढत; राष्ट्रवादींच्या फाटाफुटीचा भाजपाला फायदा?

या जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधित्व ओबीसी समाजाकडे राहिले असून या वेळी गट सर्वसाधारणसाठी आरक्षित झाल्याने मराठा समाजाला संधी मिळावी यासाठी कवठे येमाईचे बाळासाहेब डांगे हे इच्छुक असून पिंपरखेडचे शिरूर तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष देवदत्त निकम यांचे कट्टर समर्थक माऊली ढोमे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत.या निवडणुकीत सर्वच इच्छुक जिल्हा परिषदेच्या रिंगणात प्रथमच उतारणार असल्याने आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सर्वांचा कस लागणार आहे.

Pune Locकवठे-टाकळी हाजी गटातील लढती ठरणार लक्षवेधीal Body Election 2025
Pune Grand Challenge: पुणे ग्रँड चॅलेंज टूरमुळे सायकल स्पर्धेतून पुण्याची जागतिक ओळख

टाकळी हाजी गणावर आ. वळसे यांचे बारीक लक्ष

टाकळी हाजी गण इतर मागासवर्ग महिला आरक्षित असल्याने या गणातून विजयी होणाऱ्या उमेदवारांची पंचायत समिती सभापती पदासाठी वर्णी लागण्याची शक्यता असल्याने या गणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील 42 गावातील पंचायत समिती गणांपैकी टाकळी हाजी गणातील सदस्याला शिरूर पंचायत सभापती पदाची संधी असल्याने या गणाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप वळसे पाटील यांचेही बारीक लक्ष असल्याची चर्चा आहे. कवठे येमाई गण सर्वसाधारण महिला आरक्षित आहे. पंचायत समितीसाठी इच्छुकांची नावे समोर आली नसली तरी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवारांकडून निवडणूक सोपी होण्यासाठी योग्य महिला उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news