Katraj Kondhwa Road Widening: कात्रज-कोंढवा रस्तारुंदीकरणाला वेग; राजस सोसायटी परिसरात मोठी कारवाई

नऊ इमारतींसह अनेक अतिक्रमणे हटवली; वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेची मोहीम तीव्र
Katraj Kondhwa Road Widening
Katraj Kondhwa Road WideningPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील वाहतूक कोंडीची गंभीर समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला महापालिका प्रशासनाने गती दिली असून, शुक्रवारी राजस सोसायटी परिसरात मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईत नऊ दुमजली आरसीसी इमारती, १४ पत्र्यांची शेड, १२ स्टॉल, तसेच अनेक सीमाभिंती हटविण्यात आल्या.

Katraj Kondhwa Road Widening
Pune Vehicle Fitness Certificate: दिवे आरटीओ कार्यालय रविवारीही खुले; योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाला प्राधान्य

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांच्या उपस्थितीत पथ, बांधकाम, अतिक्रमण, तसेच भूसंपादन व व्यवस्थापन विभागाच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबविली. कात्रजकडून कोंढव्याकडे जाणाऱ्या मार्गावरील निखिल मार्बल ते एसबीआय चौक, सुंदरबन या परिसरातील रस्तारुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या बाधित मिळकतींवर कारवाई करण्यात आली.

Katraj Kondhwa Road Widening
MVA Internal Conflict: विधान परिषदेच्या निकालानंतर महाविकास आघाडीत वादाची ठिणगी

महापालिकेने संबंधित मिळकतधारकांना साहित्य हटविण्यासाठी सुमारे दहा दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतरही अतिक्रमणे कायम असल्याने प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारला. उर्वरित मिळकतधारकांनी स्वखर्चाने अडथळे दूर करावेत, अन्यथा पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Katraj Kondhwa Road Widening
Pune Nashik Railway Route: पुणे-नाशिक रेल्वेमार्ग बदलावर जनआक्रोश; सोशल मीडियावर लोकप्रतिनिधींना धारेवर

या कारवाईसाठी महापालिकेने ६ जेसीबी, १४ डम्पर, २ क्रेन, २५ बिगारी, तसेच महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांची मदत घेतली. सुमारे ११,५०० चौरस मीटर व्यावसायिक आणि १,४१० चौरस मीटर निवासी क्षेत्रातील अतिक्रमणे हटविण्यात आली. कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी येत्या काही दिवसांतही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Katraj Kondhwa Road Widening
Manchar Crime: मंचर मधील गोहे बुद्रुक दुहेरी बालमृत्यू प्रकरण; पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

सातारा रस्ता आणि सोलापूर रस्ता या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या कात्रज-कोंढवा मार्गाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन विकास आराखड्यानुसार ८४ मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्यात येत असून, यासाठी १०९ मिळकतधारकांच्या सुमारे ४१ हजार चौरस मीटर क्षेत्राचा निवाडा जाहीर करण्यात आला आहे. मुख्य रस्त्यासह दोन्ही बाजूंना सेवा रस्ते, यू-ड्रेन आणि माऊलीनगर येथे ग्रेड सेपरेटर उभारण्याचे नियोजन आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news