

पुणे: वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे काम वेळेत पूर्ण व्हावे, तसेच वाहनचालक व वाहनमालकांची गैरसोय टाळण्यासाठी दिवेत रविवारी (दि. ७ जून) शासकीय सुटीच्या दिवशीही कामकाज सुरू राहणार आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी कळविले आहे.
वाहनचालक, वाहनमालक तसेच विविध वाहन संघटनांनी आपल्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यासाठी संबंधित कार्यालयात वाहने तपासणीसाठी सादर करावीत.
तसेच सर्व स्कूल बसचालक आणि मालकांनी आपल्या स्कूल बसची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करून घ्यावे. स्कूल बस वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे, असेही भोसले यांनी कळविले आहे.