Katraj Kondhwa Flyover: कात्रज-कोंढवा उड्डाणपुलावर रात्री वाहतूक बंद

दि. ३१ ऑगस्ट ते दि. ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दररोज रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत उड्डाणपुलावरील वाहतूक अंशतः बंद ठेवण्यात येणार आहे.
Katraj Kondhwa Flyover
Katraj Kondhwa FlyoverPudhari File Photo
Published on
Updated on

पुणे: कात्रज-कोंढवा उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेले संरचनात्मक दुरुस्तीचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी दि. ३१ ऑगस्ट ते दि. ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दररोज रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत उड्डाणपुलावरील वाहतूक अंशतः बंद ठेवण्यात येणार आहे.

महापालिकेकडून यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. बंद कालावधीत उड्डाणपुलावरून जाणारी वाहतूक उड्डाणपुलाखालील सेवा रस्त्यावरून वळवण्यात येणार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी कात्रज-कोंढवा मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना सेवा रस्त्याचा वापर करावा लागणार आहे.

Katraj Kondhwa Flyover
Pune RMC Plants: परवान्याविना आरएमसीचे ‘काँक्रीट’ साम्राज्य; बावधनमध्ये आठ आरएमसी प्लांट चालताहेत विनापरवाना

दुरुस्तीचे काम सुरक्षितपणे करता यावे आणि वाहतुकीवर होणारा परिणाम मर्यादित राहावा, यासाठी रात्रीची वेळ निश्चित केली आहे.

Katraj Kondhwa Flyover
Pune Crime News: मांसाहारी जेवणावरून वाद; मारहाणीत मुलाचा मृत्यू; आई-वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

दुरुस्तीचे काम जलद आणि सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी नागरिक व वाहनधारकांनी सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. अधीक्षक अभियंता (प्रकल्प) राजेंद्र जाधव यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news