Kasturi Club Haldi Kunku Program: कस्तुरींसाठी खास हळदी-कुंकू; स्टार प्रवाहच्या कलाकारांची थेट भेट!

संक्रांतीनिमित्त पुण्यात रंगणार कस्तुरी क्लबचा महिलांसाठी खास सांस्कृतिक उत्सव
Kasturi Club
Kasturi ClubPudhari
Published on
Updated on

पुणे: मकरसंक्रांत आपण सगळ्यांनी आनंदात अन्‌‍ उत्साहात साजरी केली. याच संक्रातीच्या आनंदी सणाच्या निमित्ताने दै. ‌‘पुढारी‌’ कस्तुरी क्लब आणि स्टार प्रवाह वाहिनीच्या वतीने हळदी-कुंकू हा विशेष कार्यक्रम फक्त महिलांसाठी आयोजित करण्यात आला आहे. रविवारी (दि. 8 फेबुवारी) दुपारी 3 वाजता सहकारनगर येथील शिवदर्शन येथे असलेल्या राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमधील सभागृहात हा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमात विविध खेळ, कलाकारांना भेटण्याची आणि संवाद साधण्याची संधी कस्तुरी सदस्यांना मिळणार आहे. संक्रांतीच्या आनंदाला मनोरंजन, परंपरा आणि सामाजिक भान याची जोड देण्यासाठी हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला आहे.

Kasturi Club
Warje Popular Nagar Development: वारजे पॉप्युलर नगरमध्ये बदलाचा शब्द; भारतभूषण बराटेंची विकासदृष्टी

‌‘पुढारी‌’ कस्तुरी क्लबच्या वतीने वर्षभर महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात कस्तुरी सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळतो. त्याचाच एक भाग म्हणून कस्तुरींसाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात मराठी संस्कृतीचा सन्मान, परंपरा आणि सामाजिक संदेश याचा संगम कस्तुरींना अनुभवायला मिळणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‌‘लपंडाव‌’ या मालिकेतील सरकार (रूपाली भोसले), कान्हा (चेतन वडनेरे), सखी (कृतिका देव) या कलाकारांची उपस्थिती कार्यक्रमात असणार आहे.

Kasturi Club
Pune Municipal Election Analysis: प्रभाग 9 सुस-बाणेर-पाषाणमध्ये अटीतटीची लढत; भाजप-राष्ट्रवादी 2-2

कलाकारांसोबत गप्पा, त्यांच्यासोबत रील्स बनविण्याची संधी आणि मनोरंजक खेळ यामुळे कार्यक्रमाचा उत्साह, आनंद आणखी द्विगुणित होणार आहे. याचबरोबर कस्तुरींसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्यामुळेही या कार्यक्रमाला वेगळीच रंगत येणार आहे. या कार्यक्रमासठी महिलांना अस्सल मराठमोळा साजशृंगार (नऊवारी, शेला, पारंपरिक दागिने) करता येणार असून, सामाजिक भान जागवणारी थीम, महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ या माध्यमातून दिले जाणार आहे. तसेच, यानिमित्ताने लकी ड्रॉही काढण्यात येणार आहे.

Kasturi Club
Solar Storm 2026: 11 वर्षांतील सर्वात मोठे सौरवादळ; पुण्यात दुर्बिणीतून सूर्यावरील डागांचे दर्शन

‌‘लपंडाव‌’ ही मालिका सध्या चर्चेत आहे, कारण तिच्या कथानकात कौटुंबिक नाती, त्यातील प्रेम, गैरसमज, मतभेद आणि त्यातून उभे राहणारे भावनिक चढउतार यांचा सुंदर संगम प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या मालिकेत रूपाली भोसले ( सरकार), चेतन वडनेरे ( कान्हा), कृतिका देव (सखी) हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. रूपाली भोसले म्हणजे सरकार यामध्ये स्व:ताच्या विचारांवर ठाम, आत्मविश्वासू, स्पष्टवक्तेपणा, जबाबदार, संवेदनशील असलेल्या स्त्रीची भूमिका साकारत आहे. कान्हा (चेतन वडनेरे) याची व्यक्तिरेखा कथानकात रोमांचकारी वळण आणते. सखी (कृतिका देव) यांच्या भूमिकेत गोडवा आणि निरागसता, नात्याबद्दलचा जिव्हाळा दिसून येतो. ‌‘लपंडाव‌’ ही केवळ प्रेमकथा नसून नात्यांमधील सत्य-असत्य, मनातील खेळ गुपिते आणि एकमेकांवरील विश्वास याची कसोटी घेणारी कथा आहे. नात्यांमध्ये कधी गोड क्षण येतात, तर कधी गैरसमज निर्माण होतात, हे सर्व एका लपंडावच्या खेळासारखे अनपेक्षितपणे घडते हे या मालिकेच्या शिर्षकातूनच सूचित होते.

Kasturi Club
Pune Illegal Country-Made Pistols: पुण्यात गावठी पिस्तुलांचा धंदा उघड! उमरटी कनेक्शन उघडकीस, टोळीचा पर्दाफाश

कस्तुरींना बक्षिसे, भेटवस्तू मिळण्याची संधी

या कार्यक्रमासाठी कस्तुरी सदस्यांकरिता लाल किंवा पिवळ्या रंगाची साडी आणि हिरव्या बांगड्या अशा पेहरावाची थीम ठेवली आहे. येणाऱ्या प्रत्येक कस्तुरींना दंताळे ज्वेलर्सकडून एक ग््रॉमचे कानातले वाण म्हणून देण्यात येणार आहेत. यासह अभिनेत्री होम मिनिस्टर फेम आणि प्रबोधनकार मेघना झुझम यांचा भन्नाट गेम शोही यावेळी रंगणार आहे. त्यामुळे संक्रांतीचा उत्सव आणि सेलिबिटींची भेट, असे निमित्त कस्तुरींना अनुभवता येणार आहे. अधिक माहितीसाठी 8888808027 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कस्तुरींना काय मिळणार?

संक्रांतीनिमित्त रविवारी कस्तुरी सदस्यांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येक कस्तुरींना दंताळे ज्वेलर्सकडून एक ग््रॉमचे कानातले वाण म्हणून देण्यात येणार आहेत.

कधी व कुठे

  • कधी: रविवारी, 8 फेबुवारी

  • वेळ: दुपारी 3 वाजता

  • कुठे: राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमधील सभागृह, शिवदर्शन रोड, पुणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news