

माणिक पवार
नसरापूर : नव्याने अस्तित्वात आलेल्या कामथडी-भोंगवली जिल्हा परिषद गटात दिग्गज उमेदवारांबरोबर नवख्या उमेदवारांची लढत होणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप अशी चौरंगी लढत होणार असल्याने इच्छुक गावागावात जाऊन मोर्चेबांधणी करत आहेत. याच गटातून भोर पंचायत समिती सभापती पदासाठी आपल्याच पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी आपापल्या पक्षाकडे पतिराजांनी ‘फिल्डिंग’ लावली आहे. (Latest Pune News)
कामथडी-भोंगवली गटात जिल्हा परिषद उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग््रेास आणि भाजप या पक्षात मोठी रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी काँग््रेासचे माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेले चंद्रकांत बाठे व जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य विक्रम खुटवड यांनी दंड थोपटले आहे. पंचायत समितीसाठी महिला आरक्षण असल्याने सुनीता बाठे व तृप्ती खुटवड ह्या देखील रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राष्ट्रवादी काँग््रेास पक्षात या गटातून एक जिल्हा परिषद सदस्य व भावी सभापती महिला अशा वाटाघाटीनुसार राष्ट्रवादीमध्ये तोडगा निघू शकतो अशी चर्चा झडत आहे.
शिवसनेचे कुलदीप कोंडे यांनी या गटातून लढण्यासाठी कार्यकर्ते आग््राह धरत आहे. भाजपकडून वैभव धाडवे पाटील, माजी उपसभापती रोहन बाठे, माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल लेकावळे, महेश टापरे, तर राजगड कारखान्याचे संचालक के. डी. सोनवणे यांचे चिरंजीव महादेव सोनवणे हे प्रबळ इच्छुक आहेत. शिवसेना पक्षातमधून कुलदीप कोंडे, तालुकाप्रमुख दशरथ जाधव यांचे नाव पुढे येत आहे. काँग््रेास पक्षातून दत्तात्रय झांजले इच्छुक आहेत. शरदचंद्र पवार पक्षातून उमेदवाराबाबत सुतोवाच करण्यात आलेले नाही.
कामथडी गणात महिला आरक्षण असल्याने भाजपकडून सरपंच निता इंगुळकर, सोनम गोळे, शशिकला गोरड, हेमलता धावले, प्राजक्ता पांगारे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग््रेासकडून वंदना गोरड, सारिका मालुसरे, वैशाली गाडे, शिवसेनेकडून क्रांती धुमाळ, मनीषा पांगारकर, मोनिका जाधव इच्छुक आहेत. तसेच भोंगवली सर्वसाधारण गणात राष्ट्रवादी काँग््रेास पक्षातून गणेश निगडे, उदय शिंदे यांची नावे पुढे येत आहेत. भाजपचे महेश धाडवे, अनिल साळुंखे, वसंत परबळ, विनोद चौधरी, शिवसेनेकडून विकास चव्हाण, हर्षद बोबडे, किशोर बारणे, अक्षय सोनवणे हे देखील रिंगणात उतरणार असून नेमके कोणत्या पक्षातून लढणार हे स्पष्ट केले नाही.
गेली दोन दशके पत्रकार क्षेत्रात काम करणारे वैभव धाडवे पाटील यांनी देखील त्यांच्या शूरवीर मावळा संघटनाच्या माध्यमातून सामाजिक आणि विधायक कार्यात ठसा उमटविला आहे. वैभव धाडवे हे भाजप, शिवसेना की शरदचंद्र पवार पक्षातून लढणार याकडे नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
भोर तालुक्यातील जि. प.,पं. स.च्या राजकारणावर गेली 20 ते 25 वर्षे केळवडे, केंजळ, उत्रोली, हातवे या गावांचे वर्चस्व राहीलेले आहे. या निवडणुकीमध्ये यात बदल करण्यासाठी नव्या चेहऱ्यांचे वर्चस्व निर्णायक ठरणार आहे.