Kamala Nehru Hospital: कमला नेहरू रुग्णालयाच्या अत्याधुनिकीकरणाच्या कामाची गणेश बिडकरांकडून पाहणी

१३ कोटींच्या निधीतून कायापालट; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘पुण्याचे प्रगतीपर्व’मध्ये भूमिपूजन
Kamala Nehru Hospital
Kamala Nehru HospitalPudhari
Published on
Updated on

पुणे : पुणे महापालिकेच्या सर्वांत मोठ्या कमला नेहरू रुग्णालयासाठी मंजूर १३ कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या अत्याधुनिकीकरणाच्या कामाची माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सोमवारी पाहणी केली. दरम्यान, या कामाचे औपचारिक भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'पुण्याचे प्रगतीपर्व' या कार्यक्रमादरम्यान करण्यात आले.

Kamala Nehru Hospital
Kabaddi Player Murder Case Pune: राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप

पुणे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे, कमला नेहरू रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत बोठे आणि रुग्णालयाचे इतर विभागप्रमुख यांच्यासमवेत बिडकर यांनी अत्याधुनिकीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेतला. कमला नेहरू रुग्णालयात पाच अद्ययावत ऑपरेशन थिएटर्सची उभारणी सुरू आहे.

Kamala Nehru Hospital
Navale Bridge Elevated Road: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नवले पुलावरील एलिव्हेटेड ब्रिजला तातडीची मंजुरी

रुग्णालयाचे विस्तारीकरण, सुशोभीकरण, रुग्णांसाठी प्रतीक्षालय, उपहारगृह, ऑन-ग्रीड सोलर यंत्रणेची उभारणी अशी कामेही याअंतर्गत केली जाणार आहेत. रुग्णांची वाढती संख्या पाहता २५ तज्ज्ञ डॉक्टर आणि इतर मनुष्यबळ यांची भरतीप्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

Kamala Nehru Hospital
Pune Book Festival: पुणे पुस्तक महोत्सवाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांची भेट

कमला नेहरू रुग्णालयात लहान मुलांसाठी अतिदक्षता विभाग व ऑपरेशन थिएटर सुरू करण्याचा विचार आहे, अशी माहिती डॉ. बोठे यांनी दिली. शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेले ४३० बेडचे कमला नेहरू रुग्णालय हे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न आहे. या रुग्णालयात पुणे मनपाचे इतर दवाखाने व खासगी रुग्णालयातून रुग्ण उपचारांसाठी पाठवले जातात.

Kamala Nehru Hospital
Tribal Art Festival Pune: आदिवासी कला म्हणजे निसर्गाच्या लयीतून साकारलेली जागतिक ठेवा

या रुग्णालयाचा कायापालट करण्यासाठी बिडकर यांना कायम पुढाकार घेतला आहे. दोन मजल्यांवरून बहुमजली झालेले कमला नेहरू रुग्णालय हे बिडकर यांच्या प्रयत्नांमधून उभे राहिले आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष असताना बिडकर यांच्या प्रयत्नांतून कमला नेहरू रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी मोठा निधी उपलब्ध झाला होता.

-------------

फोटो - १६ कलर ४, ५

ओळ - कमला नेहरू रुग्णालयात नव्याने बांधल्या जाणाऱ्या ऑपरेशन थिएटरची पाहणी करताना गणेश बिडकर यांच्या समवेत महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news