Pune Traders Protest: पुण्यात अतिक्रमण कारवाईवरून व्यापारी आक्रमक; तोडगा न निघाल्यास शहर बंदचा इशारा

परवानाधारक व्यापाऱ्यांवरही पूर्वसूचनेशिवाय कारवाई होत असल्याचा आरोप; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्तक्षेपाची मागणी
Traders Protest
Traders ProtestPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: पुणे महापालिकेकडून गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईविरोधात शहरातील व्यापारी आक्रमक झाले आहेत. अधिकृत परवानाधारक, नियमित कर भरणाऱ्या आणि नियमानुसार व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवरही कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई केली जात असल्याचा आरोप पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाने केला आहे.

Traders Protest
Pune Encroachment Removal Drive: पुणे महापालिकेचा अतिक्रमणांवर सलग आठव्या दिवशीही हातोडा; २.३२ लाख चौ. फूट जागा मोकळी

या प्रकरणी, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी हस्तक्षेप करून योग्य निर्देश द्यावेत, अशी मागणी संघाने केली आहे. अन्यथा, संपूर्ण पुणे बंद ठेवण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Traders Protest
Baramati Crime: मुलगाच हवा म्हणून विवाहितेचा इच्छेविरुद्ध गर्भपात; पतीसह चौघांवर बारामतीत गुन्हा

महापालिकेच्या कारवाईमुळे शेकडो व्यापाऱ्यांना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. या कारवाईच्या निषेधार्थ सोमवारी (दि. २३) व्यापाऱ्यांनी आंदोलनही केले. अनधिकृत अतिक्रमणांवरील कारवाईला संघाचा विरोध नाही.

Traders Protest
Baramati Teacher Case: अल्पवयीन विद्यार्थिनीवरील अत्याचारप्रकरणी शिक्षकाला २० वर्षांची शिक्षा; ४५ हजारांचा दंड

मात्र, महापालिका आयुक्तांनी व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून कारवाईची योग्य कार्यप्रणाली निश्चित करावी, अशी मागणी संघाने केली आहे. या प्रश्नावर व्यावहारिक तोडगा न निघाल्यास पुणे बंद ठेवण्याची मागणी व्यापारीवर्गातून होत आहे.

Traders Protest
Purandar Water Shortage: पुरंदरमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद; अंबाजीचीवाडीचा तलाव कोरडा, ग्रामस्थांची टँकरची मागणी

त्यामुळे पालकमंत्र्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, असे निवेदन संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन निवंगुणे आणि महिला अध्यक्षा शिल्पा भोसले यांनी दिले आहे. याबाबत प्रशासनाशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री पवार यांनी दिल्याचे निवंगुणे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.