पुणे : आरटीई प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी 7 जुलैची मुदत

पुणे : आरटीई प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी 7 जुलैची मुदत

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीतील दुसरी फेरी सुरू करण्यात आली आहे. त्यात राज्यातील 8 हजार 826 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला असून, शाळेत प्रवेश निश्चित करण्यासाठी 7 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. आरटीईच्या अद्याप 23 हजारांहून अधिक जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे.
वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात येतात.

प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा 8 हजार 823 शाळांतील 1 लाख 1 हजार 846 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी एकूण 3 लाख 64 हजार 413 अर्ज दाखल झाले. प्रवेशासाठीच्या सोडतीतून 94 हजार 700 नियमित प्रवेश जाहीर करण्यात आला, तर 25 हजार 890 विद्यार्थ्यांचा प्रतीक्षा यादीत समावेश होता. नियमित प्रवेशप्रक्रियेनंतर जागा रिक्त राहिल्याने प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू करण्यात आले. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची एक फेरी पूर्ण झाली आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व प्रवेश फेर्‍यांतून 78 हजार 23 विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाले आहेत. तर, 23 हजार 809 जागा अद्यापही प्रवेशासाठी शिल्लक राहिल्याचे उघडकीस आले आहे.

हे ही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news