Jejuri Mahashivratri Trikal Darshan: महाशिवरात्रीनिमित्त जेजुरी गडावर त्रैलोक्य शिवलिंग दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी

स्वर्ग, भूलोक व पाताळ लोकी शिवलिंग दर्शनाची दुर्मीळ पर्वणी; व्हीआयपी दर्शन बंद ठेवल्याने भाविक समाधानी
Jejuri Mahashivratri
Jejuri MahashivratriPudhari
Published on
Updated on

जेजुरी: महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरात महशिवरात्र उत्सवा निमित्त त्रैलोक्य शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.पहाटे तीन पासून शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या.

Jejuri Mahashivratri
Maharashtra Indigenous Cattle IVF Program: देशी गोवंश संवर्धनासाठी आयव्हीएफ-भ्रूण प्रत्यारोपण करार; दूध उत्पादन वाढीस चालना

महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या वर्षाकाठी दहा यात्रा भरतात. यातील महाशिवरात्र उत्सवाला धार्मिक महत्व आहे. कैलास पर्वता नंतर जेजुरी गडावर भगवान शंकर व पार्वती यांचे शिवलिंग आहे. म्हणून जेजुरीला दक्षिण काशी मानले जाते. जेजुरी गडाच्या मुख्य शिखरावर स्वर्ग लोकी शिवलिंग, मुख्य मंदिरात स्वयंभू भूलोकी शिवलिंग व मंदिरात तळघरात पाताळ लोकी शिवलिंग आहे.

Jejuri Mahashivratri
AI for Agriculture 2026: मुंबईत ‘एआय फॉर ॲग्री 2026’ जागतिक परिषद; शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा नवा युगारंभ

शिखर आणि तळघरात असणारे शिवलिंग फक्त महाशिवरात्री दिवशी भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाते. महाशिवरात्री दिवशी तिन्हीही शिवलिंगाचे दर्शन घेण्याची पर्वणी भाविकांना उपलब्ध होते. आज मध्यरात्री 12 वाजता शिखरावरील व तळघरांतील शिवलिंग खुली करण्यात आली. मानकरी वर्गाच्या पूजा झाल्यानंतर पहाटे तीन वाजता त्रैलोक्य शिवलिंग दर्शन सुरू करण्यात आले. पहाटे पासूनच हजारो भाविकांनी रांगा लावून दर्शन सुरू केले. या दर्शनासाठी चार ते पाच तास लागत होती.

Jejuri Mahashivratri
Pune Flower Exhibition 2026: पुण्यात 44 वे भव्य पुष्पप्रदर्शन सुरू; 266 विभागांत आकर्षक फुलांची मेजवानी

श्री मार्तंड देवसंस्थान च्या वतीने महाशिवरात्र उत्सवानिमित्त जेजुरी गडावर व मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फुलांची सजावट करण्यात आली होती. रांगेत पाणी, महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. दर्शन रांगेची चोख व्यवस्था करण्यात आली होती.व्हीआयपी दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद ठेवल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.

Jejuri Mahashivratri
Daund Bike Accident: दौंड तालुक्यात आयशर टेम्पोची दुचाकीला धडक; एक ठार, एक जखमी

तसेच महाशिवरात्र उत्सवानिमित्त स्वर्ग लोकी पातळ लोकी व भुलोकी शिवलिंगाचे दर्शन झाल्याने भाविक आनंद व्यक्त करत होते. श्री मार्तंड देवसंस्थान चे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे,तसेच विश्वस्त,व्यवस्थापक , आधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्या वतीने दर्शन व्यवस्थेचे चांगले नियोजन करण्यात आले होते. गर्दी नियंत्रित करण्यासाठी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उद्या ही या त्रैलोक्य दर्शनाची पर्वणी भाविकांना उपलब्ध होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news