JEE Mains 2026 Result: जेईई मेन्स 2026 निकाल जाहीर; महाराष्ट्रातील सिद्धार्थ आठल्ये अव्वल

देशभरातील 26 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल; पुण्याच्या विद्यार्थ्याची चमकदार कामगिरी, राज्याचा गौरव वाढवला
JEE Main 2026 Session 2
JEE Main 2026 Session 2Pudhari
Published on
Updated on

पुणे: राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतर्फे (एनटीए) घेण्यात आलेल्या आणि अभियांत्रिकी प्रवेशासाठी महत्त्वाची असलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) मुख्य 2026 च्या सत्र 2 चा (बी.ई./बी.टेक पेपर 1) निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत देशातील एकूण 26 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल गुण मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली. यामध्ये महाराष्ट्रातील सिद्धार्थ आठल्ये आणि माधव विराडिया या दोन विद्यार्थ्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे.

JEE Main 2026 Session 2
Temghar Dam Plot Allotment Scam: टेमघर प्रकल्पातील भूखंड वाटपात अनियमिततेचा आरोप

जेईई मेन्स 2026 सत्र 2 परीक्षेची उत्तरतालिका सोमवारी दुपारी ‌’एनटीए‌’कडून जाहीर करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी 6 वाजल्यानंतर एनटीएचा निकाल जाहीर करण्यात आला. एनटीएने जाहीर केलेल्या निकालानुसार. 100 पर्सेंटाईल मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आंध प्रदेशामधून पसाला मोहिथ, बिहारमधून शुभम कुमार, दिल्लीतून आदित्य गुप्ता, गुजरातमधून पुरोहित निमय, हरियाणामधून अनय जैन, महाराष्ट्रातून माधव विराडिया आणि सिद्धार्थ आठल्ये, ओडिशामधून भावेश पात्रा, राजस्थानमधून कबीर छिल्लर, तामिळनाडूतून थाम्मिना गिरीश, तेलंगणामधील मंथा कामेश या विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल मिळवत अव्वल आले आहेत. देशभरातील अव्वल 26 विद्यार्थ्यांमध्ये विविध राज्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश असून, तेलंगणा, आंध प्रदेश आणि राजस्थान या राज्यांचा दबदबा यंदाही कायम राहिल्याचे चित्र आहे.

JEE Main 2026 Session 2
Pune Overhead Cables Issue: पुण्यात ओव्हरहेड केबल्स भूमिगत करण्याचा आराखडा

जेईई मेन्स परीक्षा जानेवारी आणि एप्रिल अशा दोन सत्रांमध्ये घेण्यात आली. जानेवारीमध्ये सत्र 1 ची परीक्षा घेण्यात आली होती. तर 2 ते 8 एप्रिलदरम्यान सत्र 2 ची परीक्षा घेण्यात आली. देशातील 319 शहरांमधील 584 केंद्रांवर ही परीक्षा झाली. यामध्ये भारताबाहेरील 15 शहरांचाही समावेश होता. ही परीक्षा एकूण 13 भाषांमध्ये संगणक आधारित पद्धतीने घेण्यात आली. जेईई मेन्स 2026 सत्र 2 परीक्षेसाठी तब्बल 11 लाख 10 हजार 904 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 7 लाख 56 हजार 976 विद्यार्थी तर 3 लाख 53 हजार 928 मुलींचा समावेश होता. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 10 लाख 34 हजार 330 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकूण उपस्थितीचे प्रमाण 93.11 टक्के इतके होते. निकालात 56 विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित ठेवण्यात आले आहेत.

JEE Main 2026 Session 2
Pune Ward Committee Elections Results: पुणे प्रभाग समिती निवडणुकीत भाजपचे वर्चस्व

जेईई ॲडव्हान्स्डसाठी 93.41 पर्सेंटाईलची पात्रता

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान 93.41 पर्सेंटाईल आवश्यक आहे. ईडब्ल्यूएस, ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गांसाठी हा कटऑफ अनुक्रमे कमी ठेवण्यात आला आहे. यंदा दोन्ही सत्रांचा विचार करून विद्यार्थ्यांना सर्वोत्तम गुणांवर आधारित अंतिम पर्सेंटाईल देण्यात आला आहे. जे विद्यार्थी दोन्ही सत्रांना बसले होते, त्यांचा अधिक चांगला एनटीए स्कोअर ग््रााह्य धरून निकाल जाहीर करण्यात आला आहे.JEE Mains 2026 Result

JEE Main 2026 Session 2
Baramati By Election Congress: बारामती पोटनिवडणूक; राष्ट्रवादी न लढल्यास काँग्रेस मैदानात

लोकसेवेचा सिद्धार्थ आठले अव्वलस्थानी

जेईई मेन्समध्ये राज्यातील दोन विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यातील एक विद्यार्थी पुण्यातील सिद्धार्थ आठले असून, तो लोकसेवा शैक्षणिक संकुलच्या लोकसेवा ई-स्कूल पाषाण येथील विद्यार्थी आहे. सिद्धार्थ आठले याने दोन्ही सत्रांमध्ये परीक्षा देत दुसऱ्या सत्रात शतप्रतिशत गुण मिळवले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनत आणि अभ्यासामुळे त्यांनी राज्यात अव्वल स्थान मिळवले असून, राष्ट्रीय पातळीवरही त्यांची कामगिरी अत्यंत उल्लेखनीय ठरली आहे. उत्कृष्ट निकालासाठी ओळख असलेली पुण्यातील लोकसेवा शैक्षणिक संकुल ही संस्था दर्जेदार निकालासाठी ओळखली जाते.आत्ताच काही दिवसापूर्वी याच लोकसेवा संकुलाच्या नीरजा बिहानी हिने सीबीएसई दहावीच्या निकालात 99.4 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला होता. जेईई मेन्स परीक्षेत सिद्धार्थच्या या यशामुळे केवळ त्याच्या कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण संस्थेसाठी ही अत्यंत अभिमानाची आणि गौरवास्पद बाब ठरली आहे. सिद्धार्थच्या यशाने इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news