ऐकावे ते नवलच! अपहरण बीएमडब्ल्यूतून, मात्र जप्त केली मर्सिडीस

ऐकावे ते नवलच! अपहरण बीएमडब्ल्यूतून, मात्र जप्त केली मर्सिडीस

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह प्रकरणी चालकाचे अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली कार आणि पोलिसांनी जप्त केलेल्या कारच्या कंपनीच्या नावामध्ये तफावत असल्याचे आढळून आले आहे. चालकाचे अपहरण काळ्या बीएमडब्ल्यूमधून करण्यात आल्याचे पोलिसांच्या अहवालात म्हटले होते. मात्र प्रत्यक्षात पोलिसांनी अगरवाल याच्याकडून मर्सिडीस कार जप्त केली आहे.

चालकाच्या अपहरणावरूनही गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी नव्याने दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, अपघातानंतर विशाल अगरवाल याने चालक गंगाधर हेरीक्रुब याला फोन करून हा गुन्हा तू अंगावर घे. तुला चांगले बक्षीस देण्यात येईल, असा दबाव टाकला होता. त्यासाठी घरीही न जाऊ देता त्याचे एका काळ्या कारमध्ये अपहरण केले होते. ती काळी कार बीएमडब्ल्यू असल्याचे पोलिस अहवालात नमूद करण्यात आले होते. तसा जबाब चालकाने पोलिसांना दिला होता.

आता पोलिसांनी एक काळी मर्सिडीज जप्त केली आहे. त्यामुळे जप्त करण्यात आलेली कार आणि चालकाने सांगितलेल्या कार कंपनीच्या नावामध्ये फरक असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. गुन्ह्यात वापरलेली काळी कार मर्सिडीज असल्याचे व चालकाने ते नाव चुकून सांगितले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याचा प्रत्यय नुकताच न्यायालयात दाखल केलेल्या अहवालातून आला
आहे. या अहवालात पोलिसांनी केवळ गाडीच्या नंबरचा उल्लेख केला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news