

पुणे: राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑगस्ट २०२६ सत्राच्या प्रवेश प्रक्रियेतील संस्थास्तरीय समुपदेशन फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले, अशी माहीती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रणालीद्वारे https:/// admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर राबविण्यात येत असून, पात्र उमेदवारांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, नोंदणी केलेल्या मात्र अद्याप प्रवेश न मिळालेल्या उमेदवारांना ६ ते ७ ऑगस्टदरम्यान प्रवेश अर्जातील आवश्यक बदल किंवा हरकती नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर ८ ऑगस्ट रोजी समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, उमेदवारांना एसएमएसद्वारे ही माहिती दिली जाणार आहे.
समुपदेशन फेरीसाठी पात्र उमेदवारांनी ९ ते १० ऑगस्टदरम्यान आपल्या प्रवेश खात्यात लॉगिन करून संबंधित आयटीआय व व्यवसायासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. ११ ऑगस्टपर्यंत संस्थानिहाय गुणवत्ता यादी व समुपदेशनाची वेळ जाहीर केली जाईल. त्यानंतर १२ व १३ ऑगस्ट रोजी संबंधित संस्थांमध्ये प्रत्यक्ष समुपदेशन होऊन गुणवत्ता, उपलब्ध जागा व पात्रतेच्या आधारे प्रवेश निश्चित करण्यात येणार आहेत. याशिवाय १७ ते २२ ऑगस्टदरम्यान संस्थास्तरीय समुपदेशन फेरी क्रमांक २ ते ७ आयोजित करण्यात येणार आहे.
असे आहे वेळापत्रक
हरकती नोंदवणे / अर्जातील माहिती दुरुस्ती ६ ऑगस्ट स. ९ वा. ते ७ ऑगस्ट सायं. ५ वाजेपर्यंत
समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध ८ ऑगस्ट सायं. ५ वाजेपर्यंत
समुपदेशन फेरीसाठी नोंदणी ९ ऑगस्ट स. ९ वा. ते १० ऑगस्ट सांय ५ वाजेपर्यंत
संस्थानिहाय गुणवत्ता यादी व समुपदेशनाची तारीख/ वेळ जाहीर ११ ऑगस्ट सकाळी ११ पर्यंत
संस्थास्तरीय समुपदेशन फेरी व जागा वाटप १२ ऑगस्ट स.८ वा. ते १३ ऑगस्ट ५ वाजेपर्यंत
मूळ कागदपत्र पडताळणी व प्रत्यक्ष प्रवेश १२ ऑगस्ट स. ८ वा. ते १३ ऑगस्ट सांय ५ वाजेपर्यंत
संस्थास्तरीय समुपदेशन फेरी क्र. २ ते ७
उमेदवारांची प्रत्यक्ष हजेरी नोंदणी १७ ते २२ ऑगस्ट स. ८ वा. ते ११
संस्थानिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध १७ ते २२ ऑगस्ट दररोज दुपारी १२ वा.
समुपदेशन व जागावाटप १७ ते २२ ऑगस्ट दुपारी १ पासून अंतिम उमेदवारापर्यंत
खासगी आयटीआय संस्थांमधील संस्थास्तरावरील प्रवेश
संस्था स्तरावरील व रिक्त जागांवरील प्रवेशप्रक्रिया १३ जुलै स. ९ ते २२ ऑगस्ट रात्री ११:५९ वाजेपर्यंत