Pune Defense Education | देश-विदेशातील 28 सैनिकांना सागरी अभियांत्रिकीचे प्रशिक्षण

International Officers Training | एकुण 28 अधिकार्‍यांनी लोणावळा येथील आयएनएस शिवाजी येथे सागरी अभियांत्रिकी हा अभ्यासक्रम (एमईएससी) यशस्वीरित्या पूर्ण केला.
International Officers Training
आयएनएस शिवाजी,लोणावळा येथे सागरी सैनिकी प्रशिक्षण केलेल्या देश-विदेशातील सैनिकांचा सत्कार करण्यात आला. Marine Engineering Training (Pudhari File Photo)
Published on
Updated on

International Officers Training

पुणे : भारतीय नौदलातील 14 आणि श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, घाना, बांगलादेश व कॅमेरून येथील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थींचा समावेश असलेल्या एकुण 28 अधिकार्‍यांनी लोणावळा येथील आयएनएस शिवाजी येथे सागरी अभियांत्रिकी हा अभ्यासक्रम (एमईएससी) यशस्वीरित्या पूर्ण केला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्हाइस अ‍ॅडमिरल संजय साधू उपस्थित होते. अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून अधिकार्‍यांनी विविध युद्धनौकांवर प्रत्यक्ष कौशल्य प्रशिक्षण घेतली. प्रशिक्षणार्थींनी सागरी अभियांत्रिकी उपकरणांच्या विविध ऑपरेशन्स आणि देखभालीची तांत्रिक कौशल्ये सादर केली.

International Officers Training
Pune News: रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी; घोरपडी येथे वाहनचालक, नागरिकांची गैरसोय

समारंभाच्या परेड दरम्यान, विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकार्‍यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. लेफ्टनंट अभिनव सिंग रावत यांना सर्वोत्तम ऑल-राउंड ऑफिसर व सर्वोत्तम खेळाडू चषक, लेफ्टनंट इंद्रनील बॅनर्जी यांना इंजिन रूम वॉच कीपिंग चषक, बांगलादेश नौदलाचे लेफ्टनंट कमांडर एमडी अबू सुफियान यांना बेस्ट इंटरनॅशनल ऑफिसर ट्रेनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

International Officers Training
Pune News: मंदिर खेडमध्ये आणि पायर्‍यांचा भाग आंबेगावात! तालुक्यांतील अधिकार्‍यांमध्ये समन्वयाचा अभाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news