पुणे : पुढारी वृत्तसेवा : सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटी या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष, सचिव आणि इतर विश्वस्तांच्या वतीने बराच काळा कारभार झाला. त्यांची चौकशी करा, असे स्वयंप्रेरित (स्यु-मोटो) आदेश पुणे येथील धर्मादायसह आयुक्त सुधीर बुक्के यांनी दिले आहेत. दैनिक 'पुढारी'च्या मालिकेला आलेले हे मोठे यश आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील संस्थेतील ज्येष्ठ पदाधिकारी आत्माराम मिश्रा यांनी पुणे येथे येऊन संस्थेच्या विश्वस्तांची चौकशी करा, अशी तक्रार धर्मादाय सहआयुक्तांच्या नावाने दिली होती. मात्र त्यांच्यावर दबाब आल्याने त्यांनी ही तक्रार मागे घेतली. मात्र तरीही सहआयुक्तांनी या प्रकरणाची स्यु-मोटो दखल घेत चौकशीचे आदेश दिले. हे आदेश या संपूर्ण प्रक?णाला कलाटणी देणारे आहेत.