खासगी रुग्णालयांमधील खाटांची माहिती ऑनलाइन

खासगी रुग्णालयांमधील खाटांची माहिती ऑनलाइन
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब आणि गरजू रुग्णांना सवलतीत उपचार आणि खाटा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. खासगी रुग्णालयांकडून बरेचदा खाटा उपलब्ध नसल्याचे कारण दिले जाते. रुग्णालयांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागातर्फे ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात येत आहे. त्यामुळे खाटांची उपलब्धता ऑनलाइन समजू शकणार आहे. रुग्णांना सवलतीच्या दरात किंवा मोफत उपचार देण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागातर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. खासगी रुग्णालयांकडून लूट होऊ नये, यासाठी ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशन तयार केले जात असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली. त्यामुळे रुग्णांना घरबसल्या माहिती मिळू शकणार आहे.

राज्यातील 450 धर्मादाय रुग्णालये नोंदणीकृत आहेत. सर्व रुग्णालयांमधील खोल्यांची आणि खाटांची स्थिती दररोज भरणे रुग्णालयांना बंधनकारक करण्यात येणार आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे आरोग्यदुतांची नेमणूक करण्यात येणार आहे. आरोग्यदुताचा संपर्क, आवश्यक कागदपत्रे आदींची माहिती दर्शनी भागात लावण्यात येणार आहे.

दृष्टिक्षेपात…
सर्व रुग्णालयांना बॉम्बे नर्सिंग अ‍ॅक्टमधील नियमावलीचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
राज्यात काही ठिकाणी रुग्णालयांमध्ये आगीच्या घटना घडल्या. सध्या सर्वत्र फायर ऑडिट सुरू आहे. ऑडिट केले नसल्यास धोरणात्मक कारवाई केली जाणार आहे.
तमिळनाडू, केरळ आदी राज्यांमधील सार्वजनिक आरोग्य सेवा अत्यंत सक्षम आहेत. त्याचा अभ्यास करण्यासाठी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या टीम दौर्‍यासाठी पाठवल्या आहेत. याबाबतचा अहवाल तयार करून आपल्या राज्यातील सार्वजनिक आरोग्य
सेवेतील त्रुटी भरून काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.

धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णांना सवलतीच्या किंवा मोफत दरात उपचार देणे बंधनकारक आहे. खाटा उपलब्ध असताना रुग्णालये रुग्णांना नकार देऊ शकणार नाहीत. त्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. रुग्णालयांना 'सरप्राईज व्हिजिट' देऊन तपासणी करण्यात येणार आहे.
                                                                 – प्रा. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री 

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news